कठोर शर्तींवर आधारित युरोपीय कर्जदारांच्या मदतीला झिडकारणाऱ्या ग्रीसमधील सार्वमताच्या रविवारी आलेल्या कौलाचे भारतावर थेट आर्थिक परिणाम संभवत नाहीत, तथापि गुंतवणुकीला गळती लागून रुपयांत तात्पुरती अस्थिरता दिसू शकते, असे सरकारकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
देशाच्या भांडवली बाजारात युरोपातून येणाऱ्या गुंतवणुकीच्या ओघाला प्रभावित करणारे ग्रीसमधील पेचप्रसंगाचे परिणाम दिसू शकतील, असे केंद्रीय अर्थसचिव राजीव मेहरिषी म्हणाले, तर भारत गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक असलेली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे ग्रीसमधील अरिष्टाचे येथे पडसाद उमटण्याची शक्यता खूपच कमी आहे, असा विश्वास देशाचे मुख्य अर्थसल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनीही व्यक्त केला. ग्रीसमधील कौलाचे भीतीदायी परिणाम सोमवारी भांडवली बाजारातही प्रारंभी दिसून आले. परंतु दिवसअखेर स्थानिक बाजारातील निर्देशांकांनी सकारात्मक कलाटणी घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबूती आणि जागतिक अर्थघडामोडींच्या परिणामी कच्च्या तेलाच्या घसरत असलेल्या किमतीनी बाजारात खरेदीचे चैतन्य निर्माण केले व सेन्सेक्स व निफ्टी हे निर्देशांक कमाईसह बंद झाले.
‘ग्रीस’चे काय होणार?
गिरीश कुबेर यांच्याबरोबर लाइव्ह ‘फेसबुक चॅट’
‘ग्रीस’ संकट नेमके काय आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असतील हे अतिशय सोप्या शब्दांत समजून घेण्याची संधी ‘लोकसत्ता’ तुम्हाला देत आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक आणि अर्थतज्ज्ञ गिरीश कुबेर लाइव्ह ‘फेसबुक चॅट’च्या माध्यमातून ‘ग्रीस’संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील.
* कधी : मंगळवार, ७ जुल २०१५
* कुठे : ‘लोकसत्ता’ फेसबुक पेज http://www.facebook.com/LoksattaLive
*किती वाजता : दुपारी ३ ते ४ या वेळेत.
प्रश्न कसा आणि कुठे विचाराल?
* दुपारी ३ ते ४ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर (www.facebook.com/LoksattaLive) लाइव्ह चॅटची इमेज अपलोड केली जाईल. त्या इमेजच्या खाली तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायचा आहे. गिरीश कुबेर तुमच्या प्रश्नाला तेथेच उत्तर देतील.
* तुम्ही तुमचे प्रश्न ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजच्या ‘इनबॉक्स’मध्येही पाठवू शकता.