भर मांडवात लग्न मोडल्याची असंख्य कारणं भारतात सापडतात. पण होणाऱ्या बायकोच्या आईने भर मांडवात डान्स केल्यामुळे नवऱ्या मुलाने लग्न मोडल्याचं कधी ऐकलंय का? उत्तर प्रदेशात अशी विचित्र घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्न जुळवताना वर-वधुकडून विविध गोष्टी तपासल्या जातात. लग्न अरेंज मॅरेज असेल तर दोन्ही कुटुंबांची पार्श्वभूमी, त्यांचे स्वभाव, त्यांचं राहणीमान या सर्व गोष्टींकडे आवर्जुन पाहिलं जातं. आई-वडिलांचं वर्तन कसं आहे, यावरून वधु-वराची पारख केली जाते. त्यामुळेच हातात सिगारेट घेऊन नाचणाऱ्या सासूला पाहून नवऱ्या मुलाने चक्क लग्नच मोडलंय.

हेही वाचा >> “लिव्ह इन संबंधांसाठी सामाजिक जडणघडणीशी तडजोड अशक्य”, पतीविरोधातील महिलेची याचिका कोर्टाने फेटाळली

उत्तर प्रदेशातील सांभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुलाचे राजपुरा जिल्ह्यातील एका मुलीसोबत लग्न जमलं. यांचं लग्न २७ जून रोजी होणार होतं. परंतु, लग्नपूर्व विधींमध्येच गोंधळ झाल्याने हे लग्न होऊ शकलं नाही. लग्नपूर्व विधींसाठी नवरा मुलगा वधूची मंडपात वाट पाहत होता. त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांनी नृत्य करायला सुरुवात केली. जमलेल्या लोकांमध्ये वधूच्या आईनेही ठुमके मारायला सुरुवात केली. इथवर सगळं ठीक होतं. परंतु, वधूच्या आईच्या हातात सिगारेट होती, सिगारेटचे झुरके घेतच तिने मांडवात नृत्याला सुरुवात केल्याने मुलाकडचे लोक भलतेच संतापले.

हेही वाचा >> Video : अमेरिकेत गुरू पौर्णिमेला १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण

संतापलेल्या वराने सुरू असलेल्या विधी थांबवल्या आणि लग्न मोडल्याचं जाहीर केलं. दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादामुळे हे लग्न मोडलं. अखेर लग्नाच्या विधी थांबल्या आणि दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दरम्यान, या दोन्ही कुटुंबातील वाद मिटवण्याकरता पंचायत भरवण्यात आली. सुदैवाने पंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन या दोन्ही कुटुबांमध्ये समेट घडवून आणला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom calls off wedding over mother in law dancing and smoking during celebration in a bizarre incident in up sgk
Show comments