Bride’s Father Calls Off Wedding After Groom Dances to Choli Ke Peeche Kya Hai : भारतात लग्न म्हटलं की संगीत आणि संगीत आणि नाच आलाच, प्रत्येक लग्नात हे कमी अधिक प्रमाणात सर्सास केलं जातं. पण दिल्लीतील एका लग्नात नवरदेवाने एका प्रसिद्ध बॉलिवुड गाण्यावर केलेला डान्स त्याला चांगलाच भोवल्याचे पाहायला मिळाले. नवरदेव आणि त्यांच्या मित्रांनी लग्नात ‘चोली के पीछे क्या है’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला. पण नवरीच्या वडिलांना हे न पसंत पडल्याने त्यांनी चक्क लग्नच मोडल्याचे पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाची वरात नवी दिल्लीतील लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोहचली. यावेळी नवरदेवाच्या मित्रांनी त्याला वरातीत वाजत असलेल्या बॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला. नवरदेवही मित्रांबरोबर नाचू लागला. पण हे कृती नवरीच्या वडिलांना आवडली नाही, नवभारत टाइम्सने यांसंबंधीचे वृत्त दिले आहे.

नवरदेवाचे वागणे हे आयोग्य असल्याची टीका करत मुलीच्या वडीलांनी लग्नाच्या पुढील विधी करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर नवरदेवाच्या कृतीमुळे त्यांच्या कुटुंबिक मूल्यांचा अपमान झाल्याचे सांगत त्यांनी लग्नही मोडून टाकले.

हा सगळा प्रकार पाहूण वधूला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले, यावेळी नवरदेवाने मुलीच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण हे प्रयत्न अपयशी ठरले. मीडिया रिपोर्टनुसार, लग्न मोडल्यानंतरही वडिलांचा राग संपला नाही, त्यांनी त्यांची मुलगी आणि नवरदेवाच्या कुटुंबात कोणतेही संबंध ठेवण्यासही मनाई केली आहे.

सोशल मीडियावर होतेय चर्चा

दरम्यान या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून एक्सवर अनेकांनी याबद्दल पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी मुलीच्या वडिलांनी योग्य निर्णय घेतला अन्यथा हा डान्स दररोज पाहावा लागला असतं म्हटले आहे. तर दुसर्‍या एका युजरने माझ्या लग्नात जर तु्म्ही चोली के पिछे वाजवलं तर मी देखील नाचेल अशी कमेंट केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील चंदौली येथे एका नवरदेवाने जेवण वाढण्यास उशीर केल्यामुळे त्याचे लग्न मोडले होते. त्याच दिवशी त्याने दुसऱ्या मुलीशी लग्नही केले. मात्र वधूच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार दाखल केली आणि लग्नाच्या तयारीसाठी सात लाखांचा खर्च झाल्याचा दावा केला.

Story img Loader