Groom Dies in Custody : मध्य प्रदेशातील गुना येथे पारधी समाजातील एका २५ वर्षीय आदिवासी तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले. पीडितेच्या मृत्यूप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊनही संताप व्यक्त केला. हा संताप इतका टोकाचा होता की काही महिलांनी स्वतःचा कपडेही काढले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला खाली बसून रडत होत्या. तर काही महिलांनी कपडे काढून निषेध नोंदवला. या प्रकरणामुळे पोलिसांनी त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्याचे निर्देश दिले. मात्र यामध्ये झटापट झाली. परिणामी एका महिलेच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. महिलांच्या हातातील बांगड्या फुटल्याने एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
man dies after falling into hole dug in Chembur by mumbai municipality
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना

हेही वाचा >> मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा गळफास, बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती, तारीखही तीच

देवा पारधी नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला असल्याचं या महिलांनी सांगितलं. त्यामुळे एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका कसा येईल, असा सवाल नातेवाईकांनी विचारला. पोलिसांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्याला काकांनाही मारलं. तर काका गंगाराम यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Groom Dies in Custody)

वरातीसाठी तयारी करत असतानाच अटक

रविवारी देवा पारधी या तरुणाचं लग्न होतं. वरातीला जाण्यासाठी तो तयारी करत असतानाच पोलिसांनी त्याला आणि त्याच्या काकांना चोरीच्या आरोपाखाली अटक केली. त्याचा शेवटचा फोटो सायंकाळी ४.३० वाजता शेरवाणीत काढण्यात आला होता.

पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

देवा पारधी आणि त्याच्या काकांना अटक झाल्यानंतर त्याच रात्री पोलिसांनी देवा पारधीचा मृत्यू (Groom Dies in Custody) झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना फोनवरून कळवलं. एवढंच नव्हे तर देवा पारधीच्या पत्नीने त्याच रात्री अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. तर, त्याची काकी सुरजबाई यांनी स्वतःला पेटवून घेतलं.

देवा पारधीविरोधात सात गुन्हे दाखल

देवा आणि गंगाराम यांना चोरीच्या प्रकरणावर चौकशी करण्याकरता अटक करण्यात आली होती. चोरलेल्या वस्तू परत केल्यानंतर देवा सातत्याने त्याच्या छातीत दुखत असल्याचं सांगत होता. त्यामुळे त्याला मायना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवा पारधी याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल होते. (Groom Dies in Custody)

देवा पारधीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन (Groom Dies in Custody) करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. परंतु, पोलिसांनी याप्रकरणी चौकशीचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी त्यांची मागणी मागे घेतली.

Story img Loader