Instagram Bride Scam: सोशल मीडियावरील माणसं आणि त्यांची मैत्री, प्रेम किती बोगस असतं, याचे असंख्या दाखले आजवर पाहायला मिळाले आहेत. तरीही या मोहजालात रोज कुणी ना कुणी अडकत असतं. पंजाबच्या मोगा शहरात तोंडात बोटं घालायला लावणारा प्रकार घडला आहे. दुबईमध्ये नोकरी करणारा दीपक (वय २४) हा लग्नासाठी महिन्याभरापूर्वी पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील मूळ गावी आला. शुक्रवारी त्याचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. यासाठी १५० पाहुण्यांची वरात घेऊन नवरदेव मोगा शहरात पोहोचला. लग्नाची सजवलेली गाडी, डोक्याला मुंडाळ्या, शेरवानी घालून नवरदेव लग्नस्थळी पोहोचला खरा, पण तिथे त्याच्या स्वप्नातली नवरी मात्र नव्हती. इन्स्टाग्रामवरून भेटलेली मनप्रीत कौर नावाची तरुणी अस्तित्त्वात तरी आहे का? असा प्रश्न आता दीपक आणि त्याच्या कुटुंबियांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रकरण काय आहे?

दीपक आणि मनप्रीत कौर यांची तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आधी चॅटिंग आणि नतंर कॉलिंगवर दोघांचं प्रेम बहरलं. फोनवरच दोघांनी लग्न ठरवलं. दोघांच्या पालकांनी फोनवरच लग्नाची बोलणी केली. ६ डिसेंबरचा मुहूर्त ठरला. दीपक आणि त्याचे कुटुंबिय दहा-बारा पाहुणे घेऊन लग्न करणार होते. पण मुलीकडच्या लोकांनी सांगितलं, चांगले दीडशे लोक आणा, काही हरकत नाही. शुक्रवारी दीडशे पाहुण्यांची वरात घेऊन दीपक पोहोचला. पण मोगा शहरात नवरीकडच्या लोकांनी सांगितलेले मंगल कार्यालयच अस्तित्त्वात नसल्याचं समोर आलं.

लग्नासाठी वरातीबरोबर आलेले दीपकचे नातेवाईक आणि स्वतः दीपक (Photo – TIEPL)

शुक्रवारी दुपारी वरात मोगा येथे पोहोचली. दीपकने मनप्रीतला फोन लावला. तिने सांगितले की, तिचे काही लोक वरातीला घ्यायला लगेच येत आहेत. मात्र पाच तास थांबूनही कुणीही आलं नाही. थोड्या वेळाने दीपक मनप्रीतला वारंवार फोन लावत होता, पण मनप्रीतचा फोन त्यानंतर स्विच ऑफ येत होता. पाच तास वरात ताटकळत राहिल्यानंतर अखेर त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठून मनप्रीत आणि तिच्या कथित कुटुंबियाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारी दरम्यान दीपकने तीन वर्षांपासूनचा सर्व घटनाक्रम सांगितला.

५० हजार रुपयेही घेतले

दीपक म्हणाला की, आम्ही आजवर कधीही समोरासमोर भेटलो नव्हतो. मी तिचा केवळ फोटो पाहिला होता. आता तो तिचाच फोटो होता का? याचीही शंका येते. मनप्रीतनं सांगितलं होतं की, रोझ गार्डन पॅलेसमध्ये लग्न ठेवलं आहे. पण असं काही मंगल कार्यालयच मोगामध्ये नाही. तसेच मनप्रीतने लग्नाच्या खर्चासाठी ५० हजार रुपये मागितले होते. ते तिला ऑनलाईन पाठवून आपली फसवणूक झाल्याचेही दीपकने सांगितले.

मोगा शहर दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रमुख हरजींदर सिंग यांनी सांगितले की, आम्ही दीपकच्या कुटुंबियांची तक्रार दाखल करून घेतली आहे. ज्या क्रमाकांवरून मनप्रीत कौर संवाद साधत होती, त्याबद्दल आम्ही माहिती मागितली आहे आणि लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ.