देशभरातील ४० वाणिज्य बँकांमधील अनुत्पादक मालमत्तांमध्ये ३६.९ टक्क्य़ांनी वाढ झाली असून सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांचे मूल्य आता २.२२ लाख कोटी रुपयांच्या घरात गेले असल्याची माहिती सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली. मागील वर्षी हाच आकडा १.६२ लाख रुपये होता.
यामध्ये युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या अनुत्पादक मालमत्तेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे १६० टक्के असून त्यांची अनुत्पादक मालमत्ता ६,२८६ कोटी रुपये होती. मागील वर्षी हाच आकडा २,४१८ कोटी रुपये होता, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी सांगितले. इंडियन बँकेचीही अनुत्पादक मालमत्ता मागील वर्षांच्या तुलनेत ११० टक्क्यांनी वाढून ३,७६५ कोटींच्या घरात गेली आहे. मागील वर्षी हीच रक्कम १,७८९ कोटी रुपये होती, असे ते म्हणाले. पंजाब अॅण्ड सिंध बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेत १०९ टक्के वाढ होऊन ती २,२४० कोटी रुपये झाली असल्याची माहिती चिदंबरम् यांनी दिली. यासंबंधी रिझव्र्ह बँकेने सूचना जारी केल्या असून त्यामध्ये बँकांनी मालमत्तांचा दर्जा सुधारण्याबरोबरच प्रत्येक बँकेने संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार कर्जवसुली धोरण आखणे आदी उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे.
४० बँकांमधील अनुत्पादक मालमत्ता सव्वा दोन लाख कोटी
देशभरातील ४० वाणिज्य बँकांमधील अनुत्पादक मालमत्तांमध्ये ३६.९ टक्क्य़ांनी वाढ झाली असून सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांचे मूल्य आता २.२२ लाख कोटी रुपयांच्या घरात गेले असल्याची माहिती सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली.
First published on: 12-02-2014 at 12:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gross npas of 40 banks rises 36 9 to rs 2 22 lakh crore