गेल्या काही दिवसांपासून भाव गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात ‘पाणी’ आणणाऱया कांद्याने एका व्यावसायिक वेबसाईटलाही चांगलाच झटका दिला. कांद्याच्या स्वस्तातील विक्रीतून प्रसिद्धी मिळवण्याच्या विचारात असलेली ही वेबसाईट ग्राहकांच्या तुंडूब प्रतिसादामुळे सर्व्हर क्रॅश झाल्याने बंद पडली! करायला गेले एक आणि झाले भलतेच, अशी गत या वेबसाईटची झाली.
भारतीय बाजारात कांद्याचे भाव वाढल्यानंतर ऑनलाईन व्यवहाराने स्वस्तात कांदा विकण्याची ऑफर ‘ग्रुपऑन’च्या भारतातील वेबसाईटनने नेटिझन्सना दिली. एकीकडे बाजारात कांदा ६० ते ९० रुपये किलो मिळत असताना, या वेबसाईटने अवघ्या ९ रुपये किलो दराने कांदा विकण्याची जाहिरात ‘ग्रुपऑन’ने सुरू केली. त्यांच्या या ऑफरवर नेटिझन्सने अक्षरशः तुटून पडल्यामुळे साईटवरील ट्रॅफिकचे प्रमाण वाढले. त्यामुळे सर्व्हरवर परिणाम होऊन साईटच बंदच पडली. ‘अल जझीरा अमेरिका’ याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
‘ग्रुपऑन’ने स्वस्तात कांदा विकण्याची ऑफऱ दिल्यानंतर अवघ्या ४४ मिनिटांमध्ये या वेबसाईटकडे तीन हजार किलो कांद्याची मागणी नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात १७ हजार ०६५ नेटिझन्सनी आठ हजार किलोपेक्षा जास्त कांदा या वेबसाईटच्या माध्यमातून विकत घेतला. त्यातही वेबसाईटने प्रत्येक नेटिझनला कमाल एक किलो कांदाचं विकण्याचा नियम केला होता. तरीही कांदा एवढा स्वस्त मिळतोय म्हटल्यावर नेटिझन्सनी तो घेण्यासाठी वेबसाईटवर गर्दी केली आणि त्याचा फटका साईटला बसला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा