भारताचा जीसॅट-१४ उपग्रह स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या जीएसएलव्ही डी-५ या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाने यशस्वीरीत्या सोडल्यानंतर आता या उपग्रहाची कक्षा रुंदावण्यातही यश आले आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सांगितले. अॅपोजी मोटर प्रज्वलित करण्यात आली, त्यामुळे कक्षा विस्तारण्यात यश आले.
‘७ जानेवारी व ९ जानेवारी रोजी या भूस्थिर उपग्रहाच्या कक्षा आणखी वाढवल्या जातील. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान व चीन या देशांनी आतापर्यंत क्रायोजेनिक तंत्रज्ञानात आघाडी घेतली होती पण आता भारतही त्या तंत्रज्ञानात यशस्वी ठरला. यामुळे आता दोन ते अडीच टन वजनाचे उपग्रह भारत स्वबळावर अवकाशात सोडू शकतो. जीसॅट-६ जीसॅट ७ ए, जीसॅट ९, जीआयसॅट (जिओ इमेजिंग सॅटेलाइट) व चांद्रयान २ असे अनेक प्रकल्प त्यादृष्टीने प्रक्षेपणाच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती इस्रोतर्फे देण्यात आली.
दरम्यान केरळ विधानसभेने भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे या यशाबद्दल आज अभिनंदन केले. ‘भारताच्या अवकाश संशोधन संशोधनातील हा महत्त्वाचा टप्पा असून ज्यांनी हे स्वप्न साकार करण्यात हातभार लावला, त्या सर्वाचे आम्ही अभिनंदन करतो’, असे सभापती जी. कार्तिकेयन यांनी या ठरावात म्हटले आहे.
जीसॅट-१४ उपग्रहाची कक्षा रुंदावण्यात यश
भारताचा जीसॅट-१४ उपग्रह स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या जीएसएलव्ही डी-५ या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाने यशस्वीरीत्या सोडल्यानंतर आता या उपग्रहाची कक्षा रुंदावण्यातही यश आले आहे,
First published on: 07-01-2014 at 12:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gsat 14 doing fine isro