भारताचा जीसॅट १५ हा उपग्रह ११ नोव्हेंबरला फ्रेंच गयाना येथील अवकाश तळावरून सोडला जाणार आहे. त्याच्याबरोबर अरबसॅट ६ बी हा उपग्रहसुद्धा सोडला जाणार आहे. हे दोन्ही उपग्रह एरियन ५ व्हीए २२७ प्रक्षेपकाने सोडले जाणार आहेत. जीसॅट उपग्रहाचे वजन ३१६४ किलो असून त्यामुळे जीसॅट प्रणालीची क्षमता वाढणार आहे. केयू बँडचे २४ संदेशवहन ट्रान्सपॉंडर्स उपलब्ध होणार असून जीपीएस संचलित गगन प्रणाली एल १ व एल ५ पट्टय़ात सुरू होणार आहे असे इस्रोने म्हटले आहे. भारताच्या जीसॅटसारख्या गगन व्यवस्थेतील हा तिसरा उपग्रह असून जीसॅट ८ व जीसॅट १० हे उपग्रह दिशादर्शन सेवा देत आहेत. त्यातही केयू बँड अँटेना असून त्यामुळे दिशा ओळखण्यास जीपीएससारखीच मदत होत आहे.
एरियन स्पेसच्या माध्यमातून सोडला जाणारा जीसॅट १५ हा १९ वा उपग्रह होता. त्याचा उड्डाण कालावधी सायंकाळी ६.३४ वाजता सुरू होत असून एकूण ९८१० किलोचे उपग्रह वाहून नेले जाणार आहेत. अरबसॅट ६ बीचे वजन ५७६८ किलो आहे, या उपग्रहाचे नाव ‘बद्र ७’ असे ठेवण्यात आले आहे. सौदी अरेबियातील कंपनीसाठी हा उपग्रह काम करणार आहे.
जीसॅट १५ उपग्रहाचे उद्या फ्रेंच गयानातून उड्डाण
भारताचा जीसॅट १५ हा उपग्रह ११ नोव्हेंबरला फ्रेंच गयाना येथील अवकाश तळावरून सोडला जाणार आहे.
First published on: 10-11-2015 at 01:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gsat 15 set for launch on november 10 from french guiana