भारताच्या जीसॅट-१४ या कृत्रिम उपग्रहाचे स्वदेशी बनावटीच्या जीएसएलव्ही डी-५ रॉकेटद्वारे रविवारी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणासाठीची उलटीगणती सुरु झाली आहे.
१९८२ किलो वजनाच्या जीसॅट-१४ उपग्रहाचा दूरसंचार क्षेत्रासाठी उपयोग करण्यात येणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये जीएसएलव्ही डी -५ प्रक्षेपकाव्दारे उपग्रह प्रक्षेपणाचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. यावेळच्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्ही डी -५मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून, उड्डाण यशस्वी होईल अशा विश्वास इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.