भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) जीसॅट ६ या उपग्रहाचे गुरूवारी सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह म्हणून जीसॅट- ६ कडे पाहिले जात होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवारी दुपारी ४.५२ मिनिटांनी हा उपग्रह आकाशात सोडण्यात आला. जीसॅट मालिकेतील हा बारावा उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ नऊ वर्षे आहे. एस बँड व सी बँड वापरकर्त्यांना या उपग्रहाच्या सेवेचा लाभ होणार आहे. या उपग्रहाचे वजन २११७ किलो असून त्यात ११३२ किलो इंधने व ९८५ किलो वजनाच्या मूळ उपग्रहाचा समावेश आहे. या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास सहा मीटर आहे. काल ११.५२ वाजता या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटगणती सुरू झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2015 रोजी प्रकाशित
भारताच्या जीसॅट-६ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) जीसॅट ६ या उपग्रहाचे गुरूवारी सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

First published on: 27-08-2015 at 05:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gslv d6 rocket carrying india latest communication satellite