देशात एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर (GST) गोळा करण्याबाबत आतापर्यंतचा विक्रम झालाय. एप्रिल २०२२ मध्ये एकूण १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने १ मे रोजी याबाबत निवेदन दिलंय. एकूण मासिक जीएसटी संकलनात पहिल्यांदाच १.५ लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. १ लाख कोटी रुपये संकलनाची ही सलग दहावी वेळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एप्रिल २०२२ मध्ये १ लाख ६७ हजार ५४० लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झालं आहे. यापैकी ३३ हजार १५९ कोटी रुपये सीजीएसटी (CGST), ४१ हजार ७९३ कोटी रुपये एसजीएसटी (SGST), ८१ हजार ९३९ कोटी रुपये आयजीएसटी (IGST) आणि १० हजार ६४९ कोटी रुपये सेसचा समावेश आहे. आयजीएसटीच्या रकमेत ३६ हजार ७०५ कोटी रुपयांच्या आयात कराचा आणि सेसमध्ये ८५७ कोटी रुपयांच्या आयात कराचा समावेश आहे.

एप्रिलमध्ये २५,००० कोटी रुपयांनी जीएसटी संकलन वाढलं

मार्च २०२२ मध्ये १.४२ लाख कोटी रुपयांचं विक्रमी कर संकलन झालं होतं. त्यानंतर एप्रिलमध्ये हा विक्रम मोडीत निघून नवा विक्रम प्रस्थापित झाला. एप्रिलमध्ये २५,००० कोटी रुपयांनी जीएसटी संकलन वाढलं.

हेही वाचा : बोगस बिलांसंदर्भात मोठं रॅकेट उघड, २२१५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जीएसटी विभागाकडून सूत्रधाराला अटक

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १४.८३ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झालं आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये हेच जीएसटी संकलन ११.३७ लाख कोटी रुपये इतकं होतं. म्हणजेच २०२२ मध्ये जीएसटी संकलनात ३० टक्क्यांची वाढ झाली.