गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये एटीएसकडून अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. पुन्हा एकदा एटीएस (ATS) ने गुजरातमधील कच्छमधून एका पाकिस्तानी बोटीतून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहे. बीएसएफ (BSF) च्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली आहे.
मुंब्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त
गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलोंचे कोकेन (cocaine) जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता तब्बल २५० कोटी रुपयांचे ५० किलो हेरॉईन (heroin) जप्त करण्यात आले आहे. पाकिस्तानी बोटीतून हा हेरॉईनचा साठा भारतात आणला जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर एटीएसने बीएसएफच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
२५० कोटीचे हरॉईन
गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अरबी सुमुद्रात एका बोटीतून अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. संशयित बोटीचा आम्ही पाठलाग केला आणि बोट जप्त केली तेव्हा त्यात ५० किलो हेरॉईन आढळून आले. पाकिस्तानची ही बोट असून या बोटीला ताब्यात घेण्यात आले आहे. अंतराष्ट्रीय बाजारात या हरॉईनची किंमत २५० कोटी रुपये आहे.