पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केल्याबद्दल कॉंग्रेसचे नेते आणि गुजरात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते शंकरसिंह वाघेला यांनी विश्व हिंदू परिषदेवर मंगळवारी टीका केली.
मोदी यांच्याच नेतृ्त्त्वाखाली आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण होईल, असे काही धार्मिक नेत्यांना वाटते. त्यामुळेच मोदी यांना पाठिंबा द्यावा, असा हट्ट या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे धरला आहे, असाही आरोप वाघेला यांनी केला.
निवृत्त न्यायाधीश आर. ए. मेहता यांची गुजरातचे लोकायुक्त म्हणून नेमणूक करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरही वाघेला यांनी टीका केली. लोकायुक्तांची नेमणूक प्रलंबित ठेवण्यासाठीच मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकायुक्तांची नेमणूक झाली, तर आपल्याला कर्नाटकमधील माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याप्रमाणे सत्ता सोडावी लागेल, यालाच ते घाबरत असल्याचे वाघेला यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा