गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी बलात्काराच्या गंभीर प्रकरणात जोधपुरच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कथीत संत आसाराम बापूच्या संस्थेला १४ फेब्रुवारी हा मातृ-पितृ दिवस साजरा करीत असल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आसाराम बापू आश्रमाला त्यांनी राज्य शासनाच्यावतीने हे अभिनंदनाचे पत्र लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला आणि सध्या जोधपुरच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या संस्थेला राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून लिहीलेल्या अभिनंदनाच्या या पत्रामुळे मंत्री चुडासमा यांच्यावर टीका होत आहे.

१४ फेब्रुवारी हा परदेशात ‘व्हॅलेंटाइन डे’ अर्थात ‘प्रेम दिवस’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भारतातही हा दिवस आता ‘व्हॅलेटाइन डे’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. मात्र, हा दिवस पाश्चात्यांचे अंधानुकरन असल्याचे सांगत काही हिंदुत्ववादी संघटनांनी याला कायमच विरोध दर्शवला आहे. त्यामध्ये आसारामच्या आश्रमचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याकडून १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा केला जातो.

यालाच गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांनीही पाठींबा दर्शवला आहे. तसेच यावरुन बलात्कारी आसारामच्या संस्थेचे अभिनंदन केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.