विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे भाजपा, काँग्रेस यांच्यासह आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाकडून पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदियांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाच्या लोकांनी आमच्या एका उमेदवाराचे अपहरण केल्याचे सिसोदिया म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या आरोपासह आप पक्षाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.

हेही वाचा >>> Video : “…याला उर्मटपणा म्हणतात”, राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेने समोर आणला सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ

आप पक्षाने गुजातमधील सुरत (पूर्व) या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे कांचन जरिवाला यांचे भाजपाने अपहरण केल्याचा दावा केला आहे. जरिवाला कालपासून (१६ नोव्हेंबर) त्यांच्या परिवारासह गायब असल्याचे आपने म्हटले आहे. गुजरातमध्ये निवडणुकीत पराभव होत असल्यामुळे भाजपा भयभित झालेली आहे. याच कारणामुळे भाजपाने आता आप पक्षाच्या उमेदवारांचे अपहरण करण्याचा मार्ग अवलंबला आहे, असे सिसोदिया म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Russia Ukraine War : रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक

“कांचन आणि त्यांचा परिवार कालपासून गायब आहे. ते आपल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यासाठी गेले होते. कार्यालयातून बाहेर पडल्यानंर भाजपाच्या गुंडानी कांचन यांचे अपहरण केले. आता कांचन कोठे आहेत, याची कोणताही माहिती आमच्याकडे नाही,” असे सिसोदिया म्हणाले आहेत.

हेही वाचा >>>ठरलं! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा मैदानात, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर तर ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आप पक्षाने गुजरातमध्ये सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर मागील २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.