Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले. तर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळी 8 वाजेपासून सुरूवात झाली आहे. आज पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह सुद्धा अहमदाबादमध्ये मतदान करतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राजस्थान काँग्रेसमध्ये एकजूट, पक्षांतर्गत वाद निव्वळ कथा ;पायलट

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात आज ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ८३३ उमेदाद्वार रिंगणात आहे. या ९३ जागांपैकी अहमदाबादमधील १६ जागा यंदा भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भाजपाने १९९० पासून या जागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या निवडणुकीत या ९३ पैकी भाजपाने ५१, तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यावेळी आप सुद्धा गुजरातमध्ये निवडणूक लढवत असल्याने अहमदाबादमध्ये चुरशीची लढत होईल, असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

पंतप्रधान मोदी करणार अहमदाबादमध्ये मतदान

दरम्यान, आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये पोहोचले असून त्यांनी काल दुपारी गांधीनगर येथील निवासस्थानी जाऊन आई हिराबेन मोदी यांची भेट घेतली.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आई हिराबेन यांना भेटण्यासाठी रूग्णालयात

पहिल्या टप्प्यात झाले ६० टक्के मतदान

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. दरम्यान, आज गुजरातमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा असून 8 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2022 second phase voting start pm modi will cast vote in ahmedabad spb