गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या वादग्रस्त सीडी प्रकरणामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी एक पत्र लिहून हार्दिक यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय. जिग्नेश मेवाणी यांच्याकडून हे पत्र फेसबूक आणि व्हॉटस अॅपवर शेअर करण्यात आलेय.

या पत्रात जिग्नेश यांनी म्हटले आहे की, या सीडी पाहता राजकारण आणि राजकारणी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हे दिसून येते. गुजरातमधील संपूर्ण यंत्रणा एका नेत्याचा आवाज दाबून टाकण्यासाठी कार्यरत आहे. भाजपने या निवडणुकीत सेक्स व्हिडिओजकडे नव्हे तर २०१२ मध्ये दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्ती झाली, यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते.

‘मोदी आहेत ना, मग गुजरात सुरक्षित’; भाजपचा नवा व्हिडिओ

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या हार्दिक पटेल यांच्याशी संबंधित काही वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती हॉटेलच्या रूममध्ये मुलीबरोबर दिसत आहेत. तर आणखी एका व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल आणि त्यांचे मित्र एका मुलीबरोबर दिसत आहेत. हे सर्वजण एका बेडवर आराम करत असल्याचे व्हिडिओत दिसते. मात्र, हार्दिक पटेल यांनी यापूर्वीच संबंधित सीडी बनावट असल्याचे म्हटले होते. त्यावर हार्दिक पटेलने व्हायरल झालेली सीडी चुकीची असल्याचे ४ दिवसांमध्ये सिद्ध करुन दाखवावे, असे आव्हान अश्विन सांकडसरिया यांनी दिले आहे. ‘हार्दिकच्या सीडीची न्यायवैद्यक चाचणी करण्यात यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली. ‘काँग्रेसने १८२ जागांवर उमेदवार देताना हार्दिक पटेलचे मत विचारात घेतले जाईल, असे म्हटले होते. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसमधील काही लोकच अशाप्रकारे सीडी व्हायरल करत आहेत,’ असेही सांकडसरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

जाहिरातीतून ‘पप्पू’ शब्द वगळा; निवडणूक आयोगाचे भाजपला आदेश

Story img Loader