पीटीआय, नवी दिल्ली

बिल्किस बानो अत्याचार आणि कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्या प्रकरणातील दोषी असलेल्या ११ जणांना देण्यात आलेली माफी रद्द करताना गुजरात राज्याविरोधात काही निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली. न्यायालयाच्या या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

no action taken in hate speech fir
चिथावणीखोर भाषणांना राज्य सरकारचं अभय? सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानंतरही गृहखातं निवांत
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
shambhuraj desai
मंत्री शंभुराज देसाईंकडून कायद्याची अवहेलना, उच्च न्यायालयाकडून नाराजी
Crime against office bearers of society in Aundh for excommunicating a computer engineer
संगणक अभियंत्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी औंधमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
supreme Court on Kolkata Rape case
Kolkata Rape and Murder : कोलकाता पीडितेच्या हत्येआधीचे काही तास कसे होते? सहकाऱ्यांनी काय सांगितलं?
delhi police chargesheet in parliament security breach
संसद घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल; लोकशाहीची नाचक्की करण्याचा हेतू असल्याचा आरोप
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Thane education officer, suspension,
ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात पुनर्विचार याचिका सूचिबद्ध करण्याचा अर्जही फेटाळला. ‘‘पुनरावलोकन याचिका, आव्हानाधीन आदेश आणि त्याबरोबर जोडलेली कागदपत्रे काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे पुनरावलोकन याचिका फेटाळण्यात आली आहे,’’ असे खंडपीठाने म्हटले आहे.

हेही वाचा >>>Arvind Kejriwal : “मोदी शक्तिशाली आहेत, पण देव नाहीत”, अरविंद केजरीवालांची विधानसभेत टीका; म्हणाले, “मला…”

सर्वोच्च न्यायालयाच्या ८ जानेवारीच्या निकालात गुजरात सरकारविरोधात काही निरीक्षणे केली. गुजरात राज्याला ‘सत्ता हडप करणे’ आणि ‘विवेकाचा गैरवापर’ या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मात्र ही निरीक्षणे चुकीची असल्याचे गुजरात सरकारने याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या समन्वय पीठाने मे २०२२ मध्ये, गुजरात राज्याला ‘योग्य सरकार’ मानले होते आणि १९९२ च्या माफी धोरणानुसार दोषींपैकी एकाच्या माफीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश राज्याला दिले होते, असेही याचिकेत म्हटले आहे.

‘‘१३ मे २०२२ रोजी समन्वय खंडपीठाच्या निकालाच्या विरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल न केल्याबद्दल गुजरात राज्याविरुद्ध सत्ता हडपण्याचा कोणताही प्रतिकूल निष्कर्ष काढता येणार नाही,’’ असे पुनरावलोकन याचिकेत म्हटले आहे.