नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगी नूडल्सवरची बंदी गुजरात अन्न व औषध नियंत्रण प्राधिकरणाने (एफडीसीए) उठवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्येच मॅगीवरील देशव्यापी बंदी उठवण्याचा निकाल दिला होता. गुजरातचे अन्न व औषध प्राधिकरण आयुक्त एच. जी कोशिया यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मॅगीवरील बंदी उठवण्यात येत आहे. गुजरातने जुलैत मॅगीवर बंदी घातली होती, कारण त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट व शिशाचे प्रमाण जास्त आढळले होते. नंतर ही बंदी सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली होती. मॅगीच्या तीन प्रयोगशाळांमध्ये नवीन उत्पादन केल्यानंतरच्या चाचण्यात काहीही दोष आढळला नाही त्यामुळे आता मॅगीची बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजूनही गुजरातमध्ये मॅगी उपलब्ध नाही, पण लवकरच या नूडल्स उपलब्ध होतील. मॅगीचा सर्व साठा त्यावेळी बाजारातून मागे घ्यायला लावला होता. देशातील विविध भागातून घेतलेले मॅगीचे नमुने पूर्वी सदोष आढळले होते.

Story img Loader