गुजरात उच्च न्यायालयात एक अजब प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. असा प्रकार देशातील इतर कुठल्या उच्च न्यायालयात घडल्याचं कुणाच्याही ऐकिवात नाही. मात्र, या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर न्यायमूर्तींना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी बिनशर्त माफीही मागितली. मात्र, तोपर्यंत हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. अखेर हे व्हिडीओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे निर्देश गुजरात उच्च न्यायालयानं यूट्यूबला दिले आहेत. सध्या या प्रकरणाची गुजरातच्या न्यायालयीन वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार २३ ऑक्टोबर रोजी गुजरात उच्च न्यायालयात घडला. सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण होत असल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आणि व्हिडीओ लागलीच व्हायरल झाले. गुजरात उच्च न्यायालयातील चौथे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांचं एका प्रकरणाच्या निकालावरून दोन सदस्यीय खंडपीठातील त्यांच्या सहकारी महिला न्यायमूर्ती मौना भट यांच्याशी भांडण झालं. हा वाद एवढा वाढला की न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांनी सुनावणी चालू असतानाच हतातली फाईल टेबलावर भिरकावून दिली. मौना भट यांच्यावर ते चांगलेच संतापल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. त्यापाठोपाठ त्यांनी त्या दिवशी पुढे कोणत्याही प्रकरणाची सुनावणी होणार नाही असं सांगून टाकलं!

काय होतं प्रकरण?

इन्कम टॅक्सशी संबंधित एका प्रकरणाची न्यायालयात सुनावणी चालू होती. प्राप्तीकर विभागानं गेल्या सहा वर्षांचा लेखाजोखा पुन्हा एकदा करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती वैष्णव यांनी यासाठी परवानगी दिली. मात्र, या आढाव्यासंदर्भातला अंतिम आदेश न्यायालयाच्या परवानगीशिवाय दिला जाऊ नये, अशी अट त्यांनी घातली. त्यावर न्यायमूर्ती भट काही टिप्पणी करत असताना न्यायमूर्ती वैष्णव संतप्त झाले.

“मग तुम्ही या निकालावर असहमती दर्शवा ना. तुम्ही एका प्रकरणात असहमीत दर्शवली आहे, मग दुसऱ्या प्रकरणातही असहमती दर्शवा. पुटपुटू नका. तुम्ही असहमत असाल तर स्वतंत्र निकाल द्या”, असं न्यायमूर्ती वैष्णव यांनी भट यांना सांगितलं.

जाहीर माफी!

दरम्यान, हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर न्यायमूर्ती वैष्णव यांनी २५ ऑक्टोबर रोजी बिनशर्त माफी मागितली. “न्यायालयाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी सोमवारी जे काही घडलं त्यासाठी मी माफी मागतो. माझ्याकडून चूक झाली. त्यासाठी मी माफी मागतो आणि आपण कामकाजाला सुरुवात करू. जे घडलं ते घडायला नको होतं”, असं न्यायमूर्ती वैष्णव यांनी मान्य केलं.

दरम्यान, आधी सुनावणीदरम्यान झालेला वाद आणि नंतर न्यायमूर्ती वैष्णव यांनी जाहीरपणे मागितलेली माफी या घडामोडींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुजरात न्यायालयाने हे व्हिडीओ हटवण्याचे निर्देश यूट्यूबला दिले आहेत. मात्र, एक्सवर हे व्हिडीओ अजूनही मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.