गुजरात हायकोर्टाने नडियाद जिल्ह्यात झालेल्या ३० गायींच्या कत्तलीला बीभत्स म्हणत यासाठी देवही आपल्याला माफ करणार नाही असं म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाने हेदेखील म्हटलं आहे की लोकांच्या सोयीसाठी निर्दोष पशूंचा बळी दिला जाऊ शकत नाही. अशा कृत्यासाठी देवही माफ करणार नाही. नडियादमध्ये कत्तल केलेल्या गायींचे सांगाडे उघड्यावर दिसून आले. त्याचे फोटोही समोर आले ज्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने हे टिपण्णी केली आहे. भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकारने पांजरपोळात गायी ठेवल्या होत्या. त्यातल्या ३० गायींचा मृत्यू झाला. ज्यानंतर आता या प्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

न्यायमूर्ती आशुतोष शास्त्री आणि न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांच्या पीठाने म्हटलं आहे नडियाद नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या भागांमध्ये गायींच्या सांगाड्यांचे जे फोटो समोर आले आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत. या प्रकरणात नडियादचे रहिवासी मौलिक श्रीमिली यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

श्रीमाली यांनी त्यांच्या याचिकेत असं म्हटलं आहे की पांजरपोळातल्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तसंच एका खुल्या जागेवर कत्तल केलेल्या गायींचे सांगाडे फेकण्यात आले होते. यावर जस्टिस शास्त्री असं म्हणाले की हे प्रकरण खूपच अस्वस्थ करणारं आहे. लोकांच्या सोयीसाठी मुक्या प्राण्यांचा बळी दिला जाऊ शकत नाही. या कृतीसाठी आपल्याला देवही माफ करणार नाही. लोकांच्या सोयीसाठी आपण निष्पाप प्राण्यांचा बळी देऊ शकत नाही. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

Story img Loader