Man chops off four fingers: नातेवाईकाच्या डायमंड कंपनीत मनाविरुद्ध जाऊन कम्प्युटर ऑपरेटरची नोकरी करावी लागत असल्यामुळे गुजरातच्या सूरत यथील एका तरुणानं स्वतःच्या डाव्या हाताची चार बोटं छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयूर तारापरा (वय ३२) असे या युवकाचे नाव आहे. सुरुवातीला त्याने कुणीतरी बोटं छाटली असल्याचा बनाव केला. त्याने पोलिसांना सांगितले की, मित्राच्या घरी जात असताना त्याला चक्कर आली आणि तो अचानक रस्त्यावर पडला. जेव्हा त्याला शूद्ध आली तेव्हा त्याची चार बोटं कुणीतरी छाटली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत मयूर तारापराचं बिंग फुटलं आणि त्याने आपणच हे धक्कादायक कृत्य केल्याचं मान्य केलं.

नातेवाईकाच्या कंपनीत काम करायचं नव्हतं

सूरत गुन्हे विभागाने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्याबद्दल निवेदन प्रसिद्ध केलं आहे. मयूर तारापराला नातेवाईकांच्या डायमंड कंपनीत काम करायचं नव्हतं. सूरतच्या हिरा बाजारात अनभ जेम्स नावाच्या कंपनीत तो अकाऊंट विभागात कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. आपली बोटंच नसतील तर आपण या कामासाठी लायकच राहणार नाहीत आणि आपोआपच ही नोकरी सोडावी लागेल. असा विचार करून मयूर तारापरानं हे अजब पाऊल उचललं.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
attack on police Nagpur, Nagpur, police Panchnama Nagpur,
हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….
Telangana Cop Killed by Brother Over Inter-Caste Marriage
Telangana Cop Murder : ऑनर किलिंग, संपत्तीचा वाद की…, पतीशी फोनवर बोलत असताना महिला पोलिसाची भावाकडून हत्या

हे वाचा >> एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अमित शाह यांचं मोठं विधान

मयूर तारापरानं पोलिसांना सुरुवातीला सांगितलं की, ही घटना ८ डिसेंबर रोजी घडली. अमरोलीमध्ये दुचाकीवरून तो आपल्या मित्राच्या घरी जात होता. त्याचवेळी वेंदाता चौकात त्याला चक्कर आल्यामुळे तो खाली पडला. दहा मिनिटांनी जेव्हा शुद्ध आली आली तेव्हा त्याच्या डाव्या हाताची चार बोटं कापलेली असल्याचं दिसलं. पोलिसांना जेव्हा मयूरनं ही कथा सांगितली, तेव्हा त्यांना काळ्या जादूचा संशय आला. मात्र नंतर हळूहळू चौकशीत सत्य समोर आलं.

पोलिसांच्या चौकशीत मयूरनं स्वतःच हे कृत्य केल्याचं नंतर कबूल केलं. सिंगनपूर येथून एका दुकानातून त्यानं धारधार चाकू विकत घेतला होता. त्यानंतर रविवारी (८ डिसेंबर) रात्री तो अमरोली रिंग रोड येथे गेला. रात्री १० वाजता त्याने धारधार चाकूनं स्वतःची बोटं छाटली आणि रक्तस्त्राव रोखण्यासाठी पुढे कपडा बांधला. त्यानंतर चाकू आणि छाटलेली बोटं एका पिशवित भरून फेकून दिलं.

पोलिसांनी सांगितलं की, यानंतर त्याचे मित्र त्याला घेऊन रुग्णालयात गेले. पोलिसांनी मयूरने सांगितेल्या जागेवरून छाटलेली बोटं आणि चाकू ताब्यात घेतला आहे. यानंतर मयूरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader