Crime News Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list : अमेरिकेत तब्बल १० वर्षांपूर्वी आपल्या पत्नीची हत्या केल्या प्रकरणी फरार भारतीय व्यक्तीचा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) अजूनही शोध घेत आहे. या गुजराती व्यक्तीचं नाव भद्रेशकुमार चेतनभाई पटेल असं आहे. इतकेच नाही तर २०१५ मध्ये केलेल्या हत्या केल्या प्रकरणात एफबीआयच्या १० मोस्ट वाँटेड फरार गुन्हेगारांच्या यादीतही पटेलचे नाव आहे.

एफबीआयने आज पुन्हा एकदा पटेलच्या ठावठिकाणाविषयी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. याबरोबरच तो सशस्त्र आणि अत्यंत धोकादायक असल्याचेही जाहीर केले आहे.

“वॉन्टेड – सशस्त्र आणि अत्यंत धोकादायक असणारे! एफबीआयला १० मोस्ट वॉन्टेड पैकी एक भद्रेशकुमार चेतनभाई पटेल याला शोधण्यास मदत करा. पत्नीच्या हिंसक हत्या प्रकरणात फरार असलेल्या ३४ वर्षीय पटेल बद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर एफबीआयशी संपर्क साधा”, अशी पोस्ट या FBI तपास यंत्रणेकडून एक्सवर करण्यात आली आहे.

इतकेच नाही तर एफबीआय पटेल संबंधी माहिती देऊन त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्यांना २५०,००० डॉलर्सचे बक्षिस देखील जाहीर केले आहे.

कोण आहे भद्रेशकुमार चेतनभाई पटेल?

भद्रेशकुमार चेतनभाई पटेल हा एक भारतीय व्यक्ती असून याने एप्रिल २०१५ मध्ये त्याची पत्नी पलक हिची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी अमेरिकेतली सुरक्षा यंत्रणांना तो हवा आहे. त्याचा जन्म १९९० साली गुजरातमध्ये झाला होता.

एफबीआयच्या म्हणण्यानुसार, पटेल याने त्याच्या पत्नीची १२ एप्रिल २०१५ रोजी कुठल्यातरी एका वस्तूने वार करून निर्घृण हत्या केली. तेव्हा दोघे पती पर्नी हे हॅनोवर, मेरीलँड येथे एका डोनटच्या दुकानात काम करत होते. यानंतर पटेलवर फर्स्ट डिग्री मर्डर, सेकंड डिग्री मर्डर, फर्स्ट डिग्री ॲसॉल्ट, सेकंड डिग्री ॲसॉल्ट आणि इजा करण्याच्या उद्देशाने धोकादायक शस्त्र बाळगल्याचे आरोप आहेत.

पत्नीच्या हत्येदरम्यान पटेलने तिला किचनमधील चाकूने अनेक वेळा भोकसले होते. ज्यामुळे त्याच्या पत्नीला अनेक जखमा झाल्या होत्या. ही हत्या रात्री उशीराच्या शिफ्टमध्ये झाली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड झाला होता.

हत्येचं कारण काय?

पटेल आणि त्यांची पत्नी पलक यांच्यात वाद झाला होता असे तपास करणाऱ्या अधिकार्‍यांचे मत आहे. या दोघांच्या व्हिसाची मुदत एक महिन्यापूर्वीच संपली होती. त्यामुळे पलकला भारतात परत यायचे होते, तर पटेल याला अमेरिकेतच राहायचे होते. यावरून पती-पत्नींमध्ये वाद झाला होता.

Story img Loader