मूळ गुजराती असलेल्या एका व्यक्तीचा अमेरिकेमध्ये बेकायदेशीर प्रवेश करण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मॅक्सिकोमधून अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याच्या प्रयत्नात या व्यक्तीने जीव गमावला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचं नाव ब्रिजकुमार यादव असं आहे. ब्रिजकुमार यादव त्याच्या पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाबरोबर अमेरिकेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. बुधवारी त्याने मॅक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या भिंतीवर चढून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या ट्रम्प वॉलवरुन पडून या भारतीयाचा मृत्यू झाला.
तिजूआना येथून ही ट्रम्प वॉल चढून अमेरिकेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस ब्रिजकुमारने त्याच्या मुलाला घेऊन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला या भिंतीवर चढता आलं नाही. या भिंतींवर लोखंडाच्या पट्ट्या आणि तारा लावलेल्या असल्याने त्याला या भिंतीवर चढता आलं नाही आणि तो खाली पडला. या अपघातामध्ये त्याला एवढी गंभीर जखम झाली की त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. सुदैवाने ब्रिजकुमारच्या मुलाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
नक्की वाचा >> वाहन चालक ते ३३ कोटींचा मालक… बॉसशी गप्पा मारता मारता बदललं दुबईमधील ३१ वर्षीय भारतीय तरुणाचं नशीब
ब्रिजकुमारची पत्नी सॅण्डीआगोच्या बाजूला पडली. मात्र तिलाही हाताला आणि हिपबोनला दुखापत झाली. ब्रिजकुमारची पत्नी ३० फूटांवरुन खाली पडल्याने तिला दुखापत झाली. तिला सॅण्डीआगोमधील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार यादव हा कुटुंबाबरोबर बोरिसाना गावामधील टेलिफोन कॉलिनीमध्ये वास्तव्यास होता. हे गाव डिंगुचा या गावापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. डिंगुचा गावामधूनच बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जातो.
नक्की वाचा >> ३१ लाखांची भेट आणि ती ही पराभूत उमेदवाराला! सरपंचपदाची निवडणूक हरलेल्याचा गावकऱ्यांकडून विशेष सत्कार, कारण…
बुधवारी याच ठिकाणावरुन यादव कुटुंबियांसहीत एकूण ४० जणांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यापैकी बहुतांश लोक हे गुजरातमधील होते. मात्र या प्रयत्नात ब्रिजकुमारचा दुर्देवी मृत्यू झाला.