Gujarat Mehsana Wall Collapses: गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका कंपनीची भूमिगत टाकी खोदत असताना मजुरांच्या अंगावर अचानक वरील माती कोसळल्यामुळे ७ मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मेहसाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना घडल्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पण तोपर्यंत या ७ मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला.
मेहसाणाच्या जसलपूर जवळील एका गावात हे सात मजूर एका कंपनीसाठी भूमिगत टाकी खोदण्याचं काम करत होते. हे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. पण शनिवारी खोदकाम सुरु असताना अचानक वरील माती मोठ्या प्रमाणात आतमध्ये ढासळली. त्यामुळे काही क्षणात आतमध्ये काम करणारे कामगार त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरु केले. पण त्या मजुरांना वाचवण्यास यश मिळाले नाही.
#UPDATE | Gujarat: 7 people died after the wall of a private company collapsed near Jasalpur village in Kadi taluka of Mehsana district: Tarun Duggal, SP Mehsana https://t.co/EYi6c6pcHv
— ANI (@ANI) October 12, 2024
आणखी कामगार अडकल्याची भीती
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, या घटनेत सात बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यामध्ये आणखी काही कामगार अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकले आहेत का? याचा शोध घेतला जात असून बचावकार्य अद्यापही सुरू आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने माती काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
The accident caused by the wall collapse in Mehsana, Gujarat is extremely sad. My deepest condolences to those who have lost their loved ones in this… Along with this, I wish for the speedy recovery of the injured. Under the supervision of the state government, the local… https://t.co/wasWsIZieO pic.twitter.com/4zHBH2OCfA
— ANI (@ANI) October 12, 2024
दरम्यान, जिल्हा विकास अधिकारी डॉ. हसरत जास्मिन यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी १:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तसेच आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याची शक्यता आहे. आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच एकूण ८ ते ९ जण हे खोदकाम करण्याचं काम करत होते, अशी माहिती आहे. त्यामुळे अजून मजूर यामध्ये अडकल्याची शक्यता आहे. खोदकाम सुरु असताना अचानक माती खचल्यामुळे हे मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.