गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी (३१ ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत १३२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती खुद्द कुंदारिया यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली आहे.

हेही वाचा >>> Morbi Bridge Collapsed: मृतांची संख्या १३२ वर, १७७ जणांना वाचवण्यात यश; बचाव कार्य अद्यापही सुरु

Rickshaw driver stopped for drink tea and died in accident on sion panvel highway
चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Baghpat Accident
Baghpat Accident : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मोठी दुर्घटना; धार्मिक कार्यक्रमात स्टेज कोसळून ७ जण ठार, ४० जखमी
Development works worth one thousand crores will be done in Nagpur says chandrashekhar bawankule
उपराजधानीत एक हजार कोटींची विकासकामे होणार; कारागृह, बसस्थानकांसह…
new pamban bridge
समुद्रात उभारलेला पंबनचा जुना पूल वर्षांनुवर्ष टिकला; नवीन पुलाचं आयुष्य ५८ वर्षच का?
Cracks appear in Butibori overbridge, closed for traffic
निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला, गडकरींवर नामुष्कीची वेळ!, ‘एनएचआय’ने हात झटकले, आमदाराचे मौन
19 to 20 people die in road accidents every month
ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

मोहनभाई कल्याणजी कुंदारिया हे राजकोटचे खासदार आहेत. “माझ्या बहिणीच्या परिवारातील एकूण १२ सदस्यांचा या दुर्घनटेत मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच छोट्या मुलांचाही समावेश आहे,” असे कुंदारिया यांनी सांगितले आहे. तसेच बचावकार्य आणि मदतीविषयी बोलताना, “एनडीआरए, एसडीआरए तसेच स्थानिक प्रशासन नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. त्यासाठी काही रेस्क्यू बोटींची मदत घेण्यात आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे,” असे कुंदारिया यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> PHOTOS: कोसळलेला पूल, अडकलेले लोक आणि मदतीसाठी आरडाओरड; गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेची डोळे पाणवणारी छायाचित्रे 

या दुर्घटनेत आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य अजूनही सुरू असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त पूल सुरू करण्यास कोणी परवानगी दिली तसेच पूल कोसळण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला जात असताना. या घनटेची सखोल चौकशी केली जाईल. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये मृत झालेले बहुतांश महिला आणि छोटी मुलं आहेत,” असे कुंदारिया यांनी सांगितले. घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

Story img Loader