गुजरातमधील मोरबी पूलाच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या ओरेवा कंपनीच्या व्यवस्थापकाने ही दुर्घटना तर देवाची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. दीपक पारेख यांनी कोर्टात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हा युक्तिवाद केला. “अशी दुर्दैवी घटना घडली ही तर देवाची इच्छा होती,” असं त्यांनी कोर्टात म्हटलं आहे. दरम्यान सरकारी वकिलांनी यावेळी पूलाच्या केबल जीर्ण झाल्या होत्या आणि नूतनीकरणावेळी त्या बदलण्यात आल्या नव्हत्या अशी माहिती दिली.

वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅल्युमिनिअमचा पाया बदलून लाकूड वापरण्यात आल्यानेच ही दुर्घटना घडली. दरम्यान, मोरबी आणि राजकोट बार असोसिएशनने दुर्घटनेसाठी जबाबदार आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Morbi Bridge Tragedy: गुजरातमधील पूल दुर्घटनेत इतके मृत्यू होण्याचे कारण काय? NDRF अधिकाऱ्याने सांगितलं कारण

पूलाची देखभाल करण्यासाठी मोरबी महापालिका आणि अंजता ओरेवा कंपनीमध्ये १५ वर्षांसाठी करार झाला होती. मार्च २०२२ मध्ये हा करार करण्यात आला. २०१७ पर्यंत या कराराची मुदत आहे.

Morbi Bridge Collapsed CCTV: तरुणांची हुल्लडबाजी भोवली? पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही फूटेज आलं समोर, पाहा व्हिडीओ

अजिंठा- ओरेवा समूहाचे नेतृत्व प्रामुख्याने अजंता मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे (AMPL) व्यवस्थापकीय संचालक आणि अजंता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे (AEPL) संचालक जयसुखभाई भालोदिया यांच्यासह इतर चार संस्था करतात.

नेमकं काय झालं?

रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास ही घटना घडली. या भागात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिलं नव्हतं, अशी माहिती मिळत आहे. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोरबी पूल

मोरबी पूल हा ‘झूलता पूल’ नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळात नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. दुर्घटनेच्या चार दिवस आधीच गुजराती नववर्षाला हा पूल लोकांसाठी खुला करण्यात आला होता. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांचं विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे.

Story img Loader