गुजरात राज्यातील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसमधील शीर्ष नेते तसेच गुजरातमधील स्थानिक नेत्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी हा निर्णय घेतला होता. दरम्यान, पटेल यांची आगामी काळात राजकीय भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना ते येत्या गुरुवारी म्हणजेच २ जून रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. तशी माहिती भाजपा प्रवक्त्याने दिली आहे.

हेही वाचा >> Gyanvapi Row: नंदीपासून ८३ फुटांवर ‘शिवलिंग’; भिंतींवर त्रिशूल आणि हत्तीचं चिन्हं; ज्ञानवापीमधील आणखी एक व्हिडीओ समोर

हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते आप किंवा भाजपा या दोन पक्षांमध्ये सामील होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता ते येत्या दोन जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पाटेल मागील दोन महिन्यांपासून भाजपाच्या संपर्कात होते. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात प्रवेश होईल.

हेही वाचा >> काशी, मथुरा वादावर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे मोठे विधान, म्हणाले “आमच्या अजेंड्यावर…”

तीन वर्षे वाया घालवली

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली होती. मी काँग्रेसमध्ये तीन वर्षे वाया घालवली, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली होती.

हेही वाचा >> Garib Kalyan Sammelan: मोदींच्या रॅलीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी शिमल्यातील शाळांना सुट्टी; शहराची झाली पोलीस छावणी

Story img Loader