गुजरात पोलिसांनी दहशतवादविरोधी मॉक ड्रिलमध्ये वापरलेल्या लुटुपुटुच्या दहशतवाद्यांना इस्लामी पद्धतीचा पोशाख करवल्याप्रकरणी व त्यांनी इस्लामी घोषणा दिल्याप्रकरणी पोलीस दलात कारवाई होत असल्याचे आश्वासन गुजरातचे गृह राज्यमंत्री रजनी पटेल यांनी दिले.
आगामी व्हायब्रंट गुजरात समिट या कार्यक्रमाच्या आधी सुरक्षेची खात्री करण्यासाठी तेथील पोलीस दहशतवादविरोधी मॉक ड्रिल घेत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत अशा ड्रिलच्या काही चित्रफिती जाहीर झाल्या. त्यापैकी एकात नर्मदा जिल्ह्य़ातील पोलीस दोन खोटय़ा दहशतवाद्यांना पकडत असताना दिसत आहेत. ते दहशतवादी इस्लामी घोषणा देत आहेत. तत्पूर्वी सुरत ग्रामीण पोलिसांनी घेतलेल्या ड्रिलमध्ये दहशतवाद्यांनी मुस्लीम पद्धतीच्या टोप्या घातलेल्या दिसत आहेत.
या चित्रफिती जाहीर झाल्यानंतर विशिष्ट समाजावर दहशतवादी म्हणून शिक्का मारला जात असल्याची ओरड झाली. त्यावर पटेल यांनी सांगितले की, या प्रकरणी दोन्ही जिल्ह्य़ांचे पोलीस अधीक्षक चौकशी करीत आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यांतर दोषींवर नक्की कारवाई होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा