Gujarat Porbandar Coastguard Crash : गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर एका हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हे हेलिकॉप्टर तटरक्षक दलाचं असून हेलिकॉप्टर कोसळ्यामुळे तीन जण ठार झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दोन वैमानिकांसह तीन क्रू मेंबर्सचा समावेश आहे.

तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर कोसळ्याची ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता घडली असल्याची माहिती पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथसिंह जडेजा यांनी सांगितली. या अपघाताच्या घटनेनंतर जखमी झालेल्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूची पुष्टी केली. तसेच या अपघाताची चौकशी केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Prime Minister Narendra Modi Sunday cited a report by The Indian Express
PM Modi on Kejriwal: केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानावर ३३ कोटींचा खर्च; इंडियन एक्सप्रेसच्या बातमीचा हवाला देत पंतप्रधान मोदींची टीका
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
husband dies by suicide
‘तिला धडा शिकवा’, अतुल सुभाष प्रकरणाप्रमाणे व्हिडीओ बनवून पतीची आत्महत्या; पत्नीवर केले गंभीर आरोप
oyo unmarried couples rules
OYO रुमध्ये आता अविवाहित जोडप्यांना ‘नो एंट्री’; नव्या वर्षात नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या
Ramesh Budhari
Ramesh Bidhuri : “मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे…”, भाजपा उमेदवाराची जीभ घसरली!
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा : Ramesh Bidhuri : “मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे…”, भाजपा उमेदवाराची जीभ घसरली!

ही अपघातीची घटना घडल्यानतंर समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झालं. उड्डाण करताना हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह अन्य तीन जण होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. वास्तविक तटरक्षक दलाच्या विमानाने नियमित प्रशिक्षणासाठी टेकऑफ केले होते. पण काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश झाले आणि त्यात बसलेल्या तिन्ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशीच घटना दोन महिन्यांपूर्वी घटली होती. त्या घटनेत देखील तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरही अशाच प्रकारे कोसळले होते.

Story img Loader