गुजरातमधील २००२च्या नरोडा पटिया दंगलप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या भाजप आमदार माया कोदनानी यांनावैद्यकीय उपचारांसाठी गुजरात उच्च न्यायालयाने तीन महिन्यांचा जामीन दिला आहे. कोदनानी या सध्या क्षय व हृदयविकाराने ग्रस्त आहेत. नरोडा पटिया दंगलीचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सुरू आहे. त्यांनी कोदनानी यांना जामीन देण्यास जोरदार विरोध केला होता. तुरुंगातच कोदनानी यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली, मात्र कोदनानी यांच्या वकिलाने न्यायालयात वैद्यकीय कागदपत्रे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. कोदनानी या वैद्यकीय उपचारासाठी गुजरातबाहेर जाणार असतील, तर त्यांनी त्याबाबतची माहिती एसआयटीला द्यावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.
माया कोदनानी यांना तीन महिन्यांचा जामीन
गुजरातमधील २००२च्या नरोडा पटिया दंगलप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या भाजप आमदार माया कोदनानी यांनावैद्यकीय उपचारांसाठी
First published on: 13-11-2013 at 03:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat riots modis close aide maya kodnani gets bail on medical grounds