Gujarat Sabarkantha Accident Car Rams into Truck : गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. श्यामलाजींचं दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या एका कारने ट्रकला धडक दिली. कारमधील सात प्रवासी मृत्यूमुखी पडले असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. धडकेनंतर ही कार ट्रकमध्ये अडकली होती. त्यामुळे कटरच्या सहाय्याने कार कापून त्यामधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. काहीजण जागीच ठार झाले होते तर काही जखमी. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे, मात्र तिथे रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

ही कार मर्यादेपेक्षा अधिक वेळाने चालवली जात होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कार ट्रकमध्ये अडकल्यानंतर कारमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाने कटरच्या सहाय्याने कार कापून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले.

हे ही वाचा >> VHP launches campaign: ‘मुघल-ब्रिटिशांप्रमाणेच सरकारकडून मंदिरांची लूट’, विश्व हिंदू परिषद सरकारविरोधात आंदोलन छेडणार

कारमधील प्रवासी अहमदाबादचे रहिवासी

कारमधील सर्व प्रवासी हे अहमदाबादचे रहिवासी होते. हा अपघात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी देखील अग्निशमन दलाची मदत केली व जखमींना रुग्णालयात नेलं.