अनेक श्रीमंत व्यक्तींना हनीट्रॅप करून किंवा सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून लाखोंना गंडा लावल्याची प्रकरणं समोर येत असतात. अशाच एका मोठ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना समोर आलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले असून ही टोळी अत्यंत सफाईदारपणे गुजरातमधल्या मोठ्या श्रीमंत उद्योगपतींना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या टोळीची मास्टरमाईंड महिला चक्क गुजरातमधल्या एका तुरुंगातून सगळी सूत्रं हलवत असल्याचंही समोर आलं आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सारख्याच तक्रारी पाहून पोलिसांना पहिला संशय आला!

गोवा पोलिसांना या सगळ्या रॅकेटचा पहिला संशय तेव्हा आला जेव्हा वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये सारख्याच प्रकारच्या तक्रारी दाखल होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. गुजरातची तक्रारदार महिला, गोव्यात प्रवास, बलात्काराचा आरोप आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार असा पॅटर्न पोलिसांना दिसल्यानंतर त्यांनी या प्रकरणात सखोल तपास करायला सुरुवात केली.

काय होती गँगची मोडस ऑपरेंडी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही साधारण १५ लोकांची टोळी आहे. या टोळीमध्ये सदर ब्युटिशियन महिलेसह वकील, मदत करणारे इतर सदस्य आणि थेट गुजरातच्या जेलमधून सगळं नियोजन करणारी मास्टरमाईंड यांचा समावेश आहे. ही टोळी गुजरातमधल्या श्रीमंत उद्योजकांना हेरून त्यांच्याशी ओळख वाढवायची. गुजरातमधली एक ब्युटिशियन महिला या उद्योगपतींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी सलगी वाढवायची नंतर गोव्यात अमुक हॉटेलमध्ये भेटुयात, असं सांगून त्यांच्यासह गोव्यातही दाखल व्हायची. तिथे सोबत वेळ घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन लाखोंची रक्कम उकळायची अशा पद्धतीने ही टोळी काम करायची.

२२ ऑगस्टची तक्रार आणि पोलिसांचा संशय बळावला!

२२ ऑगस्ट रोजी ही ब्युटिशियन महिला तिची एक ‘चुलत बहिण’ आणि ‘ड्रायव्हर’ (हे दोघेही त्या टोळीचेच सदस्य)सोबत उत्तर गोव्याच्या कलंगुट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली. गुजरातच्या एका व्यावसायिकानं आपल्यावर उत्तर गोव्यातल्या एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पण त्याच दिवशी आरोपी व तक्रारदार यांच्यात २ लाख रुपयांची ‘तडजोड’ही झाली! तक्रारदार महिलेनं आपण कोणतीही कायदेशीर कारवाई करू इच्छित नाही, असं सांगत तक्रार मागेही घेतली.

दोन दिवसांनी तेच तिघे दुसऱ्या पोलीस स्थानकात!

दरम्यान, दोनच दिवसांत हेच तिघे कोलवले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. पण यावेळी तक्रारदार महिला मैत्रीणीचं पात्र साकारत होती, तर गेल्या वेळची तिची चुलत बहीण तक्रारदार झाली होती. गुजरातच्या एका व्यापाऱ्याशी गोव्याला येणाऱ्या विमानात आपली ओळख झाली आणि त्यानं गोव्यातल्या हॉटेलमध्ये आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेनं केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्या व्यापाऱ्याला अटक केली. अगदी याच वेळी गँगमधल्या आणखी एका महिलेनं अशाच प्रकारची तक्रार दुसऱ्या एका स्थानकात दाखल केली.

भारतीय तरुणाला चाकूने डोक्यात भोसकलं, अमेरिकेतील धक्कादायक प्रकार; हल्लेखोर म्हणतो, “मला वाटलं तो…!”

“सर्व तक्रारींमध्ये साधर्म्य होतं. त्यातील तक्रारदार गट सारखाच होता. सर्व पीडित महिला आणि आरोपी गुजरातहून गोव्यात आले होते. एक महिला डेटिंग अॅपवरून एका व्यापाऱ्याशी संपर्कात येते, ते गोव्याला येतात आणि तिथे गुन्हा घडतो. या सारख्याच घटनांमुळे आमचा संशय वाढला”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

..आणि पोलिसांनी माग काढायला सुरुवात केली

पोलिसांचा संशय बळावल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. २ लाखात तडजोड केलेल्या व्यापाऱ्याची पोलिसांनी चौकशी केली. त्यानं सांगितलं की आरोप करणाऱ्या महिलेला तो डेटिंग अॅपवर भेटला. तिनंच त्याला गोव्याला येऊन कलंगुटमधल्या त्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. हॉटेलमध्ये त्यांच्यात सहसंमतीनं लैंगिक संबंध झाले. पण दुसऱ्या दिवशी त्या महिलेनं त्याच्याकडे बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन १५ लाखांची मागणी केली. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अवघ्या ६ दिवसांत, म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी दोन महिलांसह टोळीतल्या तीन जणांना अटक केली.

५० हजार रुपयांची ‘डील’

या व्यापाऱ्यांशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्याला ५० हजार रुपये दिले जात होते, अशी माहिती आरोपी महिलांनी पोलिसांना दिली. ही टोळी गुजरातमधील शेअर बाजारातील ब्रोकर्स आणि व्यापाऱ्यांना लक्ष्य करत होती. अटक करण्यात आलेल्या महिला गरीब घरातील असून गुजरातमधल्या ब्युटी पार्लरमध्ये काम करतात. एका मध्यस्थामार्फत त्यांना या कामासाठी बोलावण्यात आलं होतं.

व्यावसायिकाच्या १६ वर्षांच्या मुलाची हत्या, महिला शिक्षिकेच्या घरी आढळला मृतदेह

या सगळ्या प्रकारात गुजरातमधल्या एका तुरुंगात असणारी एक महिला मास्टरमाईंड म्हणून भूमिका निभावत होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसी यासंदर्भात तपास करत आहेत. मोबाईल फोनच्या माध्यमातून ही महिला सगळ्या टोळीला सूचना करत होती, असंही तपासात समोर आलं आहे. त्या अनुषंगाने गोवा पोलिसांचं एक पथक गुजरातला या महिलेची चौकशी करण्यासाठी रवाना झालं आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.