Gujarat Surat News: देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणपती उत्सव पाहण्यासाठी ठिकठिकाणी भाविक येत-जात असतात. मात्र, असं असतानाच गुजरातमधील सुरतच्या लाल गेट येथील एका गणेश मंडळाच्या मंडपावर रविवारी सायंकाळी दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर सुरतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे सुरत पोलिसांनी रात्री लाठीचार्ज केला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या प्रकरणात २७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी तब्बल एक हाजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, दगडफेक करणाऱ्या २७ जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर या घटनेची चौकशी सुरु आहे. ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांच्याकडून या घटनेबाबतची माहिती घेण्यात येत असून अचानक दगडफेकीची घटना कशी घडली? नेमकी दगडफेक कोणी केली? याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, या दगडफेकीत आणि गोंधळामध्ये अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

हेही वाचा : गणेश चतुर्थीला मिरवणुकीवर दगडफेक; मध्य प्रदेशातील रतलाममध्ये तणाव

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनामध्ये गृहमंत्री संघवी यांनी म्हटलं की, “सूरतमधील सय्यदपुरा भागातील एका गणेश मंडळावर सहा जणांनी दगडफेक केली. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. यामध्ये आता २७ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असं गृहमंत्री हर्ष संघवी यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “या दंगलखोरांना सूर्योदयापूर्वी तुरुंगात टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आम्ही पूर्ण केलं आहे. आताही संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही, व्हिडीओ व्हिज्युअल आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत”, असं गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी म्हटलं आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

दगडफेकीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या घटना घडली त्या ठिकाणीच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.