गुजरातच्या पालनपूर येथील एका तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने दोन व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्या प्रियकराची माफी मागितली आहे. घरातील भांडणाला कंटाळून मी या जगाचा निरोप घेत आहे, मला माफ कर, असे या तरुणीने व्हिडीओत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुणीचे नाव राधा ठाकोर असे आहे. पालनपूर येथील ताजपुरा परिसरात ती आपल्या बहिणीच्या घरी राहत होती. येथेच त्यांचे ब्युटी सलोनही होते.

सोमवारी, १६ डिसेंबर रोजी राधा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर तिच्या बहिणीने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

हे वाचा >> पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी मृत तरुणीने दोन मिनिटांचे दोन व्हिडीओ स्वतःच्या मोबाइलमध्ये चित्रित केले. या व्हिडीओंमध्ये ती तिच्या प्रियकराला उद्देशून म्हणते, “मला माफ कर, मी तुला न सांगता हे चुकीचे पाऊल उचलत आहे. तू दुःखी होऊ नकोस. नेहमी आनंदी राहा आणि लग्न कर. मी आत्महत्या करून जीवन संपवले, याचा विचारही करू नकोस. जर तू आनंदी राहिलास, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. जर तू दुःखी राहिलास तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मी हात जोडून तुझी माफी मागते. मी आता घराला आणि रोजच्या भांडणाला कंटाळली आहे. तू मात्र आनंदी राहा आणि सर्वांना आनंदी ठेव.”

घटनेची माहिती मिळताच पालनपूर पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. राधाची बहीण आणि तिने चित्रित केलेल्या व्हिडीओनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेची माहिती देताना पालनपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, आम्ही राधाच्या बहिणीचा जबाब नोंदविला आहे. तिच्या मोबाइलमधून सुसाईड नोट आणि व्हिडीओ आम्ही हस्तगत केले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाईल.

Story img Loader