गुजरात सरकारने ऐन दिवाळीच्या काळात मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गुजरातमधील विविध तुरुंगांमध्ये १४ वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगत असलेल्या ७१ कैद्यांना सोडून देण्यात आलं. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारनेही याबाबतचे निर्देश दिले होते, असंही त्यांनी नमूद केलं. ते रविवारी (१२ नोव्हेंबर) एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

हर्ष संघवी म्हणाले, “दिवाळीच्या शुभ मुहुर्ताआधी गुजरातमधील अनेक तुरुंगांमध्ये १४ वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे अशा ७१ कैद्यांना नियमानुसार तुरुंगातून सोडून देण्यात आलं. यातील अनेक कैद्यांचं वय ७० वर्षांपेक्षा अधिक आहे. अनेक कैदी असंही आहेत ज्याचं वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे.”

prisoners e meet with family news in marathi
राज्यातील तीन लाख कैद्यांचा ‘ई-मुलाखती’द्वारे कुटुंबीयांशी संवाद, ११०० परदेशी कैद्यांना दिलासा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Darshan Thoogudeepa returned producer money
चाहत्याच्या खून प्रकरणात जामीन मिळालेल्या अभिनेत्याची तुरुंगात राहून झालीये ‘अशी’ अवस्था; निर्मात्यांचे पैसे परत करत म्हणाला…
US Indian Origin Jailed
US Indian Origin Jailed : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं भोवलं; न्यायालयाने सुनावली २५ वर्षांची शिक्षा, नेमकं काय घडलं होतं?
accused molested four year old girl sentenced to twenty years of hard labor and fine
कारागृहातून सुटल्यानंतर गोंधळ; साताऱ्यात नऊ जणांवर गुन्हा
Nagpur imprisoners loksatta news
कैद्यांना कुटुंबियांची घेता येईल ‘ई-भेट’, वेळेची होणार बचत, त्रासही होईल कमी
supreme court on illegal foreign nationals in India
मुहूर्ताची वाट पाहता का?’ सर्वोच्च न्यायालयाकडून आसाम सरकारची कानउघाडणी
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार

व्हिडीओ पाहा :

“पहिल्या टप्प्यात ७१ कैद्यांची सुटका”

“या सर्व कैद्यांनी नियमानुसार १४ वर्षांपेक्षा अधिकचा तुरुंगवास भोगला आहे. या कैद्यांनी तरुंगवासाच्या काळात सर्व नियमांचं पालन केलं आहे. तुरुंगात त्यांचं वर्तन चांगलं आहे. अशाप्रकारच्या ७१ कैद्यांना पहिल्या टप्प्यात सोडून देण्यात आलं. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या निर्देशानुसार कैद्यांच्या कुटुंबात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल,” असं मत हर्ष संघवी यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO : बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाविरोधात गुजरात विधानसभेत ठराव मंजूर; केली ‘ही’ मागणी

“७१ कैद्यांच्या घरात खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद वाढेल”

“केंद्र सरकारनेही अशाप्रकारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात १४ वर्षांपेक्षा अधिकच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगलेल्या आणि वर्तन चांगलं असलेल्या कैद्यांना कुटुंबाच्या हितासाठी असा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आज या ७१ कैद्यांच्या घरात खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद वाढेल. यासाठीच मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी हा निर्णय घेतला आहे,” असंही गृहमंत्री संघवी यांनी नमूद केलं.

Story img Loader