नैर्ऋत्य पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका कारमधील चौघांना गोळ्या घालून ठार केल़े त्यानंतर मृतदेहांसह ही कार पेटवून दिल्याची घटना शनिवारी घडल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली़
तुर्बाट जिल्ह्यातील टुम्प या सीमावर्ती गावात दुचाकीवरून आलेल्या काही मारेकऱ्यांनी कारला चहुबाजूंनी घेरले आणि गोळीबार सुरू केला़ त्यानंतर कारला आग लावून सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी हल्लेखोर पसार झाले, अशी माहिती पाकिस्तानच्या निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली़
या हल्ल्यात ठार झालेल्या दोघांच्या मृतदेहांची ओळख पटली आह़े मात्र अन्य दोन मृतदेह ओळख पटविण्यापलीकडे जळाले आहेत़ या हल्ल्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही़ तसेच अद्याप कोणत्याही अतिरेकी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही़
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा