अमेरिकेतील शिकागो येथील प्रिन्स्टन पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक विद्यार्थी जखमी झाला आहे. मृत विद्यार्थ्याचं नाव देवांश असून तो आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहे. तर कोप्पला साई चरण असं जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. तो तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील आहे.दोघंही शिकागो येथील गव्हर्नर्स स्टेट युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत.

‘शिकागो सन टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण शिकागो परिसरात सशस्त्र दरोडा टाकताना दरोडेखोरांनी दोन विद्यार्थ्यांना गोळ्या घातल्या. घटनेच्या दिवशी सायंकाळी दोन्ही विद्यार्थी दक्षिण हॉलंडमधील एका पार्किंगजवळ उभे होते. यावेळी एका गडद रंगाच्या वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तीने संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्याजवळील किमती ऐवज जमा करण्याची धमकी दिली. पीडित विद्यार्थ्यांनी आपल्याजवळील किमती वस्तू दिल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

हेही वाचा- VIDEO: अमेरिकेत चिनी नववर्षाच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार: १० जणांचा मृत्यू

शिकागोमधील गव्हर्नर्स स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर जखमी विद्यार्थी साई चरण १२ दिवसांपूर्वीच अमेरिकेला गेला होता. त्यानंतर रविवारी २२ जानेवारी रोजी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. सोमवारी या घटनेची माहिती साई चरणच्या कुटुंबीयांना देण्यात आली. साई चरणचे वडील श्रीनिवास राव हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. तर त्यांची आई शिक्षिका आहे.

Story img Loader