भारतात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार व बलात्काराच्या घटना सामोऱ्या येत असतानाच आता भारतीय दारूगोळा कारखान्याने ०.३२ बोअरची हलकी निर्भिक ही वजनाने हलकी रिव्हॉल्व्हर तयार केली आहे. तिचा वापर महिला स्वसंरक्षणार्थ करू शकतील. या रायफलचे वजन अवघे ५०० ग्रॅम असून तिचे नाव निर्भयावरून देण्यात आले आहे. या रिव्हॉल्व्हरची किंमत मात्र खूप जास्त म्हणजे १ लाख २२ हजार ३६० रुपये आहे व ती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उपलब्ध केली जाईल, असे दारूगोळा कारखान्याचे महाव्यवस्थापक अब्दुल हमीद यांनी सांगितले.
ते म्हणाले, की सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संशोधकांनी वजनाने हलकी रिव्हॉल्व्हर तयार करण्याचे संशोधन सुरू केले होते. स्त्रिया ही रिव्हॉल्व्हर पर्समध्ये ठेवू शकतात. पॉइंट ३२ बोअरची ही रिव्हॉल्व्हर ७५० ग्रॅम वजनाची असते, पण आम्ही ती ५०० ग्रॅम वजनात तयार केली आहे. तिचे नाव निर्भिक असे आहे. २०१२ मध्ये १६ डिसेंबरला निर्भया (हे बदललेले नाव होते.) नावाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना दिल्लीत घडली होती. तेव्हापासून रिव्हॉल्व्हर तयार करण्यासाठी संशोधन चालू होते. या रिव्हॉल्व्हरचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यां महिलेकडून करण्याचा विचार आहे. हमीद यांनी सांगितले, की या रिव्हॉल्व्हरसाठी दहा जणांनी मागणी नोंदवली आहे व रोज त्याबाबत महिला चौकशी करीत आहेत.
दागिन्यांच्या पेटीत रिव्हॉल्व्हर मिळणार
स्त्रियांना दागिन्यांची मोठी आवड असते, पण आता त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी असलेली निर्भिक रिव्हॉल्व्हर दागिन्यांच्या खास पेटीतून जो पहिले नाव नोंदवेल त्याला प्रथम या तत्त्वानुसार दिली जाईल. ही रिव्हॉल्व्हर टिटॅनियमच्या संमिश्राची बनवली असून ती पुरुषांनाही विकली जाईल, पण मुख्य उद्देश ती महिलांना देणे हा आहे, असे हमीद यांनी सांगितले.
स्त्रियांच्या स्वसंरक्षणासाठी हलकी रिव्हॉल्व्हर विकसित
भारतात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार व बलात्काराच्या घटना सामोऱ्या येत असतानाच आता भारतीय दारूगोळा कारखान्याने ०.३२ बोअरची हलकी निर्भिक ही वजनाने हलकी रिव्हॉल्व्हर तयार केली आहे.
First published on: 14-01-2014 at 04:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gun specially made for women for their safety