दक्षिण कॅलिफोर्नियात एका बंदूकधा-याने केलेल्या अंदाधूंद गोळीबारात ६ जणांनी आपला जिव गमावला. नंतर कॉलेज लायब्ररीजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो बंदूकधारी मारला गेला. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हजर असलेल्या कार्यक्रम स्थळापासून हे ठिकाण तीन मैलाच्या अंतरावर होते.
सांता मोनिकाचे पोलिस प्रमुख जॅक्लिन सिब्रुक्स यांच्या म्हणण्यानुसार काळे कपडे परिधान केलेला तो बंदुकधारी २५ ते ३० वयोगटातील होता. त्याचा साथिदार असल्याच्या संशयावरून एकाला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
“मारला गेलेला संशयित हल्लेखोर एकटा असावा असे आम्ही १०० टक्के सांगू शकत नाही.”, असे सिब्रुक्स पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
जखमींना तातडीने दोन रूग्णालयांत हलवण्यात आले होते. मात्र, जखमींमधील ६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader