अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात मंगळवारी रात्री उशिरा एका बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. व्हर्जिनिया प्रांतातील चेसापीक शहरातल्या एका ‘वॉलमार्ट’मध्ये ही भीषण घटना घडली आहे.
आत्महत्या, बलात्कार आणि खुनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण
‘वॉलमार्ट’मधील हल्ल्यात बंदुकधाऱ्याचाही मृत्यू झाल्याची माहिती चेसापीक शहरातील पोलीस अधिकारी लिओ कोसिंस्की यांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या घटनेवर व्हर्जिनिया राज्याच्या सिनेटर लुईस लुकास यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “देशात बंदुकधाऱ्यांकडून होत असलेल्या हिंसाचाराला थांबवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, अशी प्रतिक्रिया ट्विटरवर लुकास यांनी दिली आहे.