रविवारी सायंकाळी गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला आहे. आतापर्यंत या दुर्दैवी घटनेत एकूण १४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेतून बचावलेले लोक आपल्या जीवाभावाच्या लोकांचा शोध घेत आहेत. पण त्यांना अद्याप आपल्या माणसांचा थांगपत्ता लागत नाहीये. त्यामुळे नातेवाईक घटनास्थळी डोळे लावून बसले आहेत.

असं असताना एका युवकाची ६ वर्षाची बहीण अद्याप सापडत नाही. संबंधित युवकाने रात्रभर आपल्या बहिणीचा शोध घेतला, पण ती अद्याप सापडली नाही. त्यामुळे भावाने टाहो फोडला आहे. माझी बहीण मला परत द्या, असं म्हणत हा तरुण ओक्साबोक्सी रडत आहेत. माझी बहीण मला सापडत नाही. कृपया माझ्या बहिणीला शोधा, असं म्हणत एक तरुण घटनास्थळी ओक्साबोक्सी रडत आहे. त्याला आपले अश्रू आवरता येत नाहीये.

हेही वाचा- Gujarat Bridge Collapsed: “काही तरुण मुद्दाम पूल हलवत होते, मग आम्ही…”, दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबियांनी सांगितली आपबीती

संबंधित तरुणाने ‘बीबीसी हिंदी’शी बोलताना सांगितलं की, काल सायंकाळी दुर्घटना घडली तेव्हा मी व माझी बहीण पुलाच्या मध्यभागी फोटो काढत उभा होतो. यावेळी पुलावर किमान ८०० लोक उपस्थित होते. दरम्यान, अचानक पूल कोसळला. माझी बहीण आणि मी नदीच्या पाण्यात मध्यभागी पडलो. मी पाण्यातून कसंबसं माझा जीव वाचवला पण मी माझ्या बहिणीला वाचवू शकलो नाही. ती काल सायंकाळपासून बेपत्ता आहे. मी रात्रभर मोरबीतील सर्व सर्व सरकारी रुग्णालयात शोधाशोध केली आहे. माझी बहीण सहा वर्षाची आहे.

हेही वाचा- Morbi Bridge Collapsed CCTV: तरुणांची हुल्लडबाजी भोवली? पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही फूटेज आलं समोर, पाहा व्हिडीओ

मी माझ्या बहिणीला पहिल्यांदाच या पुलावर घेऊन आलो होतो. यावेळी पुलावर आलेल्या तीन-चार तरुणांनी जोरात पूल हलवायला सुरुवात केली. यानंतर अचानक पूल नदीत कोसळला, अशा शब्दांत संबंधित तरुणाने आपबीती सांगितली आहे. तसेच मला माझी बहीण परत पाहिजे, असं म्हणत त्याने टाहो फोडला आहे. त्याला स्वत:चे अश्रू आवरता येत नाहीयेत.

Story img Loader