देशभरात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह पाहायला मिळत आहे. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली असून फायनलमध्येही भारतीय संघानंच विजेतेपद पटकवावं अशी इच्छा प्रत्येक भारतीयाची आहे. पण त्याच दिवशी घातपात करण्याची धमकी कॅनडाती खलिस्तान्यांचा म्होरक्या गुरपतवंतसिंग पन्नूनं दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं ही धकमी दिली आहे. १९ नोव्हेंबरला शीख समुदायानं दिल्ली विमानतळावरून विमान प्रवास करू नये, असा इशाराही त्यानं दिला आहे.

गुरपतवंतसिंग पन्नू हा खलिस्तानी दहशतवादी असून भारतीय सुरक्षा व्यवस्थेसाठी तो एक फरार गुन्हेगार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गुरपतवंतसिंग पन्नू व्हिडीओच्या माध्यमातून अशी गरळ ओकताना दिसत आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत व कॅनडामधील संबंध ताणले गेले असताना त्यासंदर्भातही गुरपतवंतसिंग पन्नूनं भावना भडकावणारी व भारतविरोधी विधानं केली होती. या पार्श्वभूमीवर आता पन्नूनं वर्ल्डकप फायनलच्या दिवशी दिल्ली विमानतळाचं नाव बदलण्याची धमकी दिली आहे.

mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Annual post monsoon maintenance of runways complete
मुंबई विमानतळावरून आता उड्डाण शक्य…, का बंद होती विमान वाहतूक वाचा…
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Harsh Goenka, Singapore Prime Minister Lawrence Wong
सिंगापूरच्या पंतप्रधानांचा ‘आम आदमी’ सारखा स्वस्तातला विमान प्रवास; प्रवाशांनी केलं टाळ्यांच्या गजरात स्वागत, पाहा Viral Video
Mumbai bomb threat in three flights
तीन विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे दूरध्वनी; दोन विमाने मुंबईत थांबवली, एक दिल्लीला वळवले
Air Force fighter jet test at Navi Mumbai Airport soon
नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच
Inauguration of Solapur Airport
सोलापूर विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; महायुतीच्या दहाही आमदारांची पाठ
Solapur flight service will be launched tomorrow by the Prime Minister Narendra modi
सोलापूर विमानसेवेचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्या प्रारंभ
presence of PM Narendra Modi testing of fighter jet Sukhoi of Air Force at navi mumbai airport
ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सूखोई विमानाची चाचणी

काय आहे व्हिडीओमध्ये?

पन्नूनं जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे. “१९ नोव्हेंबरला जगभरात एअर इंडियाची विमानं जाऊ दिली जाणार नाहीत. १९ नोव्हेंबरला शिख समुदायानं एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करू नये. नाहीतर तुमच्या जिवाला धोका असू शकतो. १९ नोव्हेंबरला दिल्ली विमानतळ बंद राहील. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव शहीद बियंतसिंग, शहीद सतवंत सिंग खलिस्तान एअरपोर्ट असं केलं जाईल. आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडून ठेवणार आहोत”, अशी धमकी पन्नूनं व्हिडीओमध्ये दिली आहे.

हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली?

पन्नूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पन्नूनं वर्ल्डकप फायनलचा उल्लेख केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्या दृष्टीने अधिक चोख बंदोबस्त केला जाण्याची शक्यता आहे.

“भारतातही ‘हमास’सारखा हल्ला, तुम्ही निवडा बुलेट की..”, खलिस्थानी दहशतवाद्याचा Video; म्हणाला, “मोदीच..”

पन्नूच्या सिख्स फॉर जस्टिस अर्थात एसएफजे या संघटनेवर अमेरिकन सरकारने बंदी आणली आहे. अमृतसरमध्ये जन्मलेला पन्नू २०१९पासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. याचवर्षी एनआयएनं पन्नूच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल केला. दहशतवादी कारवायांचं नियोजन करणं, त्या अंमलात आणणं, लोकांमध्ये दहशत निर्माण करणं असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात ३ फेब्रुवारी २०२१ रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही जाप केलं आहे.