केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसीत गुरूदास कामत यांना या इराणींवरील आक्षेपार्ह टीकेविषयी आठवडाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरूदास कामत यांनी गुरूवारी राजस्थानधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांच्या पात्रतेविषयी शंका उपस्थित केली होती. यावेळी त्यांच्यावर टीका करताना कामत यांनी इराणींचा उल्लेख ‘पोचा लगानेवाली’ (साफसफाई करणारी) असा केला होता. कामत यांच्या याच विधानावर आक्षेप घेत राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठविल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी दिली. दरम्यान, कामत यांनी या सगळ्याला प्रत्युत्तर देताना, मी मुंबईत राहत असल्याने फार पूर्वी स्मृती इराणी यांना टेबल साफ करताना पाहिल्याचे म्हटले आहे. तेव्हा इराणी यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्या वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये काम करत असत. मी त्याठिकाणी अनेकदा त्यांना टेबल साफ करताना पाहिल्याचे कामत यांनी सांगितले. याशिवाय, एका अशिक्षित महिलेकडे शिक्षण खात्याचा कारभार सोपविल्याने सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरू असल्याचेही कामत यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा