कोरोना काळात जगभर वर्क फ्रॉम होमची संस्कृती वढली आहे. त्यासोबतच इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. जगभर इंटरनेटचा वापर वाढलेला असताना या इंटरनेटच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. भारतातही सायबर गुन्हेगारी डोकं वर काढतेय. याचंच एक ताजं प्रकरण गुरुग्राममध्ये पाहायला मिळालं आहे.

मूळची कर्नाटकची असलेल्या एका महिलेला घरून काम करण्याच्या (Work From Home) नावाखाली सायबर ठगांनी ८.२ लाखांचा गंडा घातला आहे. या ठगांनी यूट्युब चॅनेल सब्सक्राईब करण्याच्या बहाण्याने महिलेला फसवलं. याप्रकरणी संबंधित महिलेने गुरुग्राम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या महिलेचं नाव सरीता एस. असं असून ती गुरुग्राममधील सेक्टर ४३ परिसरात राहते.

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Women Fall From A Plastic Bucket While Standing On It To Check The Quality Funny Video Viral
“देवा काय करावं या बायकांचं?” क्वालिटी चेक करायला १५० रुपयांच्या बादलीवर उभी राहिली अन् तोल गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

सरीताने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये वर्क फ्रॉम होमद्वारे पैसे कमवा असं म्हटलं होतं. या मेसेजमध्ये म्हटलं होतं की, सुरुवातीला केवळ एका यूट्युब चॅनेलचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. ज्यासाठी प्रति सब्स्क्रिप्शन ५० रुपये द्यावे लागतील. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने महिलेला तो अ‍ॅडनेट ग्लोबल मार्केटिंग कंपनीचा असिस्टंट मॅनेजर असल्याचं सांगितलं होतं.

फसवणुकीसाठी टेलिग्रामचा वापर

सरीताने सांगितलं की, मी दोन चॅनेल्सची मेंबरशिप घेतली. त्यानंतर मला लैला नावाच्या एका रिसेप्शनिस्टचा फोन आला. तिने मला माझा टेलिग्राम आयडी शेअर करण्यास सांगितलं. मी लैलाला टेलिग्रामवर एक मेसेज पाठवला. त्यानंतर मी आणखी तीन चॅनेल्सची मेंबरशिप घेतली. त्यासाठी १५० रुपये भरले. त्यानंतर मला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडलं. यामध्ये १८० सदस्य आधीपासूनच होते. हे सर्व युजर्स वेगवेगळे टास्क करत होते.

हे ही वाचा >> “अमोल कोल्हे भाजपात येणार असतील, तर आढळरावांना…”, चंद्रकांत पाटलांची सूचक टिप्पणी! शिरूरमधली राजकीय समीकरणं बदलणार?

लैलाने सरीताला सांगितलं की, तिला दिलेला टास्क म्हणजेच काम तिने पूर्ण केलं तर तिला पैसे मिळतील. परंतु या टास्कच्या माध्यमातून तिचे ८.२० लाख रुपये लुबाडण्यात आले. त्यानंतर बुधवारी तिने मानेसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.