मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे आपल्या शेजाऱ्यांना कंटाळलेल्या एका ब्राह्मण कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली आहे. या कुटुंबामध्ये एकूण २५ सदस्य आहेत. या सर्व व्यक्तींनी आपण इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करत असल्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अनेक अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. हे पत्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे. ग्वाल्हेरमधील अपागंज येथे राहणारं हे ब्राह्मण कुटुंब शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबाला कंटाळलं आहे. या ब्राह्मण कुटुंबातील प्रमुखाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत ग्वाल्हेर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. या ब्राह्मण कुटुंबाला त्यांचे शेजरी कायम एससी-एसटी कायद्याअंतर्गत तुम्हाला अडवू अशी धमकी देत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. त्यामुळेच आता आम्हाला इस्लाम धर्म स्वीकारुन मुस्लीम बनण्याची परवानगी द्यावी कारण आता आम्हाला मुस्लिमच मदत करु शकतात, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> ‘पाच ट्रिलियनच्या नादात सगळं विकलं’, ‘मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवा’; #Resign_PRimeMinister ट्रेण्डमध्ये

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

ग्वाल्हेरमधील आपागंजमधील पूजा विहार कॉलीनीमध्ये राहणाऱ्या शर्मा कुटुंबाने ही तक्रार केलीय. शर्मा कुटुंबात २५ सदस्य आहेत. कुटुंबप्रमुखांनी केलेल्या आरोपांनुसार शेजरी राहणारे उमरैया कुटुंबिय त्यांना फार त्रास देतात. शेजाऱ्यांनी आमचं जगणं मुश्कील करुन ठेवलं आहे. आमचे शेजारी कायम आमच्याशी वाद घातलाल. शिवीगाळ करण्याबरोबरच एएससी-एसटी कायद्याअंतर्गत तुम्हाला आत करु अशा धमक्या देऊन आमचा छळ करतात असं, शर्मा कुटुंबियांचं म्हणणं आहे. आमच्या कुटुंबातील २५ जण कायमच शेजारच्यांना घाबरुन भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आम्ही अनेकदा पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आमचं काहीही ऐकून घेतलं नाही, असंही पत्रात म्हटल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

नक्की वाचा >> हे १०० रुपये घ्या आणि दाढी कटींग करुन या; महाराष्ट्रातील चहावाल्याची मोदींना मनी ऑर्डर

या रोज रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर शर्मा कुटुंबियांनी ९ जुलै रोजी यासंदर्भात पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी आमच्या कुटुंबातील २५ सदस्य हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहोत, असं म्हटलं आहे. कुटुंबप्रमुखांनी या पत्राची एक प्रत ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह आणि पोलीस अधिक्षक अमित सांघीसहीत इतर काही अधिकाऱ्यांनाही पाठवलीय.

नक्की वाचा >> ThopTV App च्या निर्मात्याला महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून अटक; कारवाईनंतर App चा सर्व्हर डाऊन

धर्मांतर करण्याची धमकी देणारं हे पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. स्थानिक पोलिसांनी शर्मा कुटुंबातील प्रमुख व्यक्तीना चर्चेसाठी बोलवून त्यांचं म्हणणं ऐखून घेतलं. पोलिसांनी त्यांना शब्द दिला की तुमच्याविरोधात तक्रार आली तरी संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन काय खोटं काय खरं याची चाचपणी केल्याशिवाय एफआयआर दाखल केली जाणार नाही. नंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून त्यांची समजून घातली.