मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे आपल्या शेजाऱ्यांना कंटाळलेल्या एका ब्राह्मण कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली आहे. या कुटुंबामध्ये एकूण २५ सदस्य आहेत. या सर्व व्यक्तींनी आपण इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करत असल्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अनेक अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. हे पत्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे. ग्वाल्हेरमधील अपागंज येथे राहणारं हे ब्राह्मण कुटुंब शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबाला कंटाळलं आहे. या ब्राह्मण कुटुंबातील प्रमुखाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत ग्वाल्हेर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. या ब्राह्मण कुटुंबाला त्यांचे शेजरी कायम एससी-एसटी कायद्याअंतर्गत तुम्हाला अडवू अशी धमकी देत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. त्यामुळेच आता आम्हाला इस्लाम धर्म स्वीकारुन मुस्लीम बनण्याची परवानगी द्यावी कारण आता आम्हाला मुस्लिमच मदत करु शकतात, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
ब्राह्मण कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याची दिली धमकी; पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र
कुटुंबप्रमुखांनी मोदींना पाठवलेल्या या पत्राची एक एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच पोलीस खात्यामधील अधिकाऱ्यांनाही पाठवली आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-07-2021 at 18:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gwalior a brahmin family warned to convert to islam wrote a letter to pm modi scsg