राज्यसभेतील भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीवरुन ग्वाल्हेरला येताना ज्योतिरादित्य शिंदे प्रवास करत असलेली गाडीला निरावली ते हाजीरा चौक या सात किलोमीटरच्या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आली नव्हती. या गोंधळाचा फटका ग्वाल्हेर आणि मुरैना पोलीस स्थानकातील १४ पोलीस कर्मचाऱ्यांना बसला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. पोलिसांच्या गाड्या ज्योतिरादित्य शिंदे बसलेल्या गाडीऐवजी दुसऱ्याचा गाडीला सुरक्षा देत होते. रात्रीच्या वेळेस मलगढा येथे हाजीरा पोलीस स्थानकाचे प्रमुख आलोक परिहार यांनी ज्योतिरादित्य शिंदे बसलेली गाडी कोणत्याही सुरक्षेशिवाय जात असल्याचे पाहिलं. त्यानंतर त्यांनी स्वत: आपल्या टीमला सोबत घेऊन या गाडीच्या मागे सुरक्षा पुरवत जयविलास पॅसेलपर्यंत ज्योतिरादित्य यांना सोडून आले.
नक्की वाचा >> …तर आधी काँग्रेसला स्वत:चं नाव बदलावं लागले; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक सल्ला
काय घडलं?
ज्योतिरादित्य शिंदे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी दिल्लीवरुन ग्वाल्हेरला आले. दिल्लीवरुन निघाल्यानंतर ग्वाल्हेरला येईपर्यंत शिंदे यांच्या गाडीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पायलेट आणि फॉलो वाहनं (नेता बसलेल्या गाडीच्या पुढे आणि मागे सुरक्षा पुरवणाऱ्या गाड्या) मिळाली. मध्य प्रदेशमधील मुरैनाच्या सीमेमध्ये प्रवेश केल्यानंतर मुरैनामधील पायलट वाहनांनी शिंदेंच्या गाडीच्या पुढे चालण्यास सुरुवात केली. आपल्या जिल्ह्यातील जुन्या छावणीच्या निरवावली पॉइण्टपर्यंत मुरैना पोलीसांच्या गाड्या शिंदे यांच्या गाडीच्या पुढे चालत होत्या. या ठिकाणी ग्वाल्हेर पोलिसांची टीम शिंदेंच्या गाडीला सुरक्षेमध्ये पुढे नेण्यासाठी तैनात होत्या. मात्र दोन जिल्ह्यांमधील पोलीस दलामध्ये ताळमेळ नसल्याने गडबड झाली. त्यामुळेच ग्वाल्हेर पोलिसांच्या टीमने शिंदेंची कार समजून दुसऱ्याच गाडीला सुरक्षा पुरवली. जवळजवळ सात किमी अंतर गेल्यानंतर पोलिसांना आपली चूक कळली. आपल्या गाडीच्या मागे चालणारी गाडी शिदेंची नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांना समजलं. मात्र तोपर्यंत इकडे ज्योतिरादित्य शिंदे बरेच पुढे निघून गेले होते.
नक्की पाहा फोटो >> जगातील ५० सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे ज्योतिरादित्य शिंदेंची पत्नी
कोणाला आधी यासंदर्भात समजलं?
नक्की वाचा >> “एवढी चिंता राहुल यांना मी काँग्रेसमध्ये असताना असती तर…”; ‘भाजपामधील बॅकबेंचर’ वक्तव्यावर शिंदेंचं उत्तर
नक्की काय गोंधळ उडाला?
पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले तेव्हा ग्वाल्हेर आणि मुरैना पोलीस स्थानाकातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत असल्याचं दिसून आलं. मुरैना जिल्ह्यामध्ये शिंदे यांच्या गाडीला फॉलो आणि पायलेटिंग करण्यासाठी रवाना झालेल्या वाहनांमध्ये नऊ पोलीस कर्मचारी होते. तर ग्वाल्हेर जिल्ह्याच्या सीमेमध्ये असणाऱ्या गाड्यांमध्ये पाच कर्मचारी होते. दोन्ही पोलिसांच्या तुकड्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही. ताळमेळ नसल्याने ग्वाल्हेर पोलिसांची गाडी चुकीच्या गाडीला फॉलो करत राहिली. यामुळेच १४ कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे. सस्पेंड करण्यात आलेल्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांमधील पाच उप निरिक्षकांचा समावेश आहे.