राज्यसभेतील भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीवरुन ग्वाल्हेरला येताना ज्योतिरादित्य शिंदे प्रवास करत असलेली गाडीला निरावली ते हाजीरा चौक या सात किलोमीटरच्या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आली नव्हती. या गोंधळाचा फटका ग्वाल्हेर आणि मुरैना पोलीस स्थानकातील १४ पोलीस कर्मचाऱ्यांना बसला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. पोलिसांच्या गाड्या ज्योतिरादित्य शिंदे बसलेल्या गाडीऐवजी दुसऱ्याचा गाडीला सुरक्षा देत होते. रात्रीच्या वेळेस मलगढा येथे हाजीरा पोलीस स्थानकाचे प्रमुख आलोक परिहार यांनी ज्योतिरादित्य शिंदे बसलेली गाडी कोणत्याही सुरक्षेशिवाय जात असल्याचे पाहिलं. त्यानंतर त्यांनी स्वत: आपल्या टीमला सोबत घेऊन या गाडीच्या मागे सुरक्षा पुरवत जयविलास पॅसेलपर्यंत ज्योतिरादित्य यांना सोडून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा